Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND Vs NZ: न्यूझीलंडने टॉस जिंकला, भारत प्रथम बॅटिंग करणार, जाणून घ्या- कोणाला मिळाला डच्चू अन् संधी

champions trophy 2025, india vs new zealand updates : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सामन्या क्रमांक-12 मध्ये भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने येतील. दोन्ही संघांमधील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दोन्ही संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. या सामन्यातील विजेता संघ उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी सामना करेल. पराभूत संघाचा सामना सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेशी होईल. या सामन्यात जिंकणारा संघ आपल्या गटात अव्वल स्थानावर पोहोचणार आहे.

हर्षित राणाला डच्चू तर वरुणला संधी

या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल करण्यात आला. वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या जागी गूढ फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने प्लेइंग-११ मध्ये प्रवेश केला. दुसरीकडे, डॅरिल मिशेल न्यूझीलंडच्या प्लेइंग-११ मध्ये परतला. अशा परिस्थितीत सलामीवीर डेव्हॉन कॉनवेला या सामन्यातून बाहेर बसावे लागले.

Champions Trophy 2025

भारताचा प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.

न्यूझीलंडचा प्लेइंग-11

विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओ'रोर्क.

विराटसाठी हा सामना असेल खास

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी हा सामना खूप खास आहे. कोहलीच्या कारकिर्दीतील हा 300 वा एकदिवसीय सामना आहे. किंग कोहली हा भारतासाठी 300 एकदिवसीय सामने खेळणारा केवळ सातवा क्रिकेटपटू आहे. या खास क्लबमध्ये मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि युवराज सिंग यांचाही समावेश आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+