टीम इंडियाच्या गोलदांजीसमोर बांग्लादेशच्या खेळाडूने गुडघे टेकले, अक्षर पटेलची हॅट्रिक थोडक्यात हूकली
Ind vs Ban Live streaming : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध बांग्लादेश टीम इंडिया यांच्यात सामना सुरु आहे. बांग्लादेशच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलदांजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय दमदार सुरुवात केली आहे.
टीम इंडियाच्या गोलदांजीसमोर पहिल्याच पॉवर प्लेमध्ये बांग्लादेशचा अर्धा संघ बाद झाला आहे. मोहम्मद शमीच्या पहिल्याच षटकात शेवटच्या बॉलवर इनस्विंग चेंडूने ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न करताना सौम्या सरकार झेलबाद झाला. यावेळी त्याला खाते ही खोलता आलं नाही. तर हर्षित राणाच्या दुस-या षटकात नजमुल हुसेन शांतोला विराट कोहलीच्या हातात अगदी आरामता झेल देऊन बाद झाला आहे.

दरम्यान टीम इंडियाचा आघाडीचा गोलंदाज मोहम्मद शम्मीने सहाव्या षटकात पुन्हा एकदा भारतासाठी महत्त्वाची विकेट घेतली! मेहदी हसन मिराजने शुभमन गिलकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर गोलदांजी आलेल्या अक्षर पटेल एकाच षटकात दोन विकेट बळकावल्या आहेत. अक्षर पटेल आठव्या षटकात लागोपाठ दोन विकेट बळकावल्या मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्याची पहिली हॅट्रीक थोडक्यात हूकली आहे. वृत्त लिहीपर्यंत 19 षटकात बांग्लादेश संघ 69/5 अशी स्थिती होती
हॅटट्रिक चेंडूवर झेल चुकला!.
अक्षर पटेल हॅट्रिक घेण्याच्या अगदी जवळ होता पण रोहित शर्माने पहिल्या स्लिपमध्ये एक सोपा झेल सोडला. जाकर अलीला दुसरी संधी मिळाली त्याने थेट रोहीत शर्माकडे स्लीपला चेंडू लगावला मात्र रोहीतकडून सोपा झेल सुटला. अगदी सोप्पा झेल सुटल्याने कर्णधार रोहीत शर्मा निराशा व्यक्त केली .












Click it and Unblock the Notifications