video: पाकिस्तानमध्ये अचानक लागले भारताचे राष्ट्रगीत; नेमके काय झाले? पहा व्हिडीओ
चॅम्पियन ट्राँफीचा चौथा सामना आज शनिवारी ऑट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळला जात आहे. या चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यापूर्वी लाहोरमध्ये चुकून ऑस्ट्रेलियन राष्ट्रगीताऐवजी भारतीय राष्ट्रगीत वाजवण्यात आले. हे राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर गद्दाफी स्टेडियममधील ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला. परंतु आयोजकांना चूक लक्षात आली आणि त्यांनी भारतीय राष्ट्रगीत थांबवले. या चुकून लागलेल्या राष्ट्रगीताचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

चुकून लागले राष्ट्रगीत
आज या मालिकेतला चौथा सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड या दोन संघात होत आहे. तेथे चुकून भारतीय राष्ट्रगीत लागले. पीसीबीच्या लक्षात ही चूक आल्यानंतर त्यांनी तत्काळ भारतीय राष्ट्रगीत थांबवले. आयोजकांची ही चूक विचित्र असली तरी, ही बाब चुकून घडली होती. भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील कोणताही सामना लाहोरमध्ये खेळण्याचा कार्यक्रम नाही. तरीही तेथे भारतीय राष्ट्रगीत कसे वाजले, असा सवाल विचारला जात आहे.
When did England become a part of India ? 🤔
— OsintTV 📺 (@OsintTV) February 22, 2025
Reportedly Pakistan played Indian National Anthem during England Vs Australia
#ChampionsTrophy2025pic.twitter.com/JfjYSUhjnn
भारताचे सर्व सामने दुबईत
आठ संघांच्या या स्पर्धेसाठी भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला. त्यानंतर आयसीसीने हायब्रिड मॉडेल स्वीकारण्याले. भारत त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे. भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारीला झाला. त्यात भारताने बांगलादेशचा पराभव केला. आता भारताचा पुढचा सामना पाकिस्तानसोबत उद्या म्हणजेच रविवारी दुबईतच होणार आहे.












Click it and Unblock the Notifications