भारत-पाक तणाव वाढणार! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच नव्या वादाला तोंड,कराची स्टेडियमवर तिरंगा लावलाच नाही
ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा प्रारंभ 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्यापूर्वीच भारत पाकिस्तान वाद वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण, चॅम्पियन्स ट्रॉफीतील काही सामने पाकिस्तानात तर काही सामने दुबईत होणार आहेत. अशातच चॅम्पियन्स ट्रॉफीचा शुभारंभ सामना ज्या ठिकाणी होत आहे, त्या स्टेडियमवर भारताचा तिरंगा झेंडा लावण्यात आलेला नाही. त्यामुळे क्रिकेट प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या घटनेचे व्हिडिओ देखीस सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने कुठे व कसे होणार?
पाकिस्तानातील तीन शहरांमध्ये (लाहोर, कराची आणि रावळपिंडी) आणि दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळवले जाणार आहे. स्पर्धेचा उद्घाटन सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराची येथे होणार आहे. तर भारतीय संघ 20 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळला जाणार आहे. अशातच नवा वाद पाहायला मिळत आहे.

कराची स्टेडियमवरील व्हिडिओ व्हायरल, नवा वादाला तोंड
चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी एक नवीन वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. खरंतर, कराचीच्या नॅशनल स्टेडियममधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, कराचीच्या राष्ट्रीय स्टेडियमच्या छतावर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या 7 देशांचे झेंडे फडकवलेले दिसत आहेत, तर भारतीय तिरंगा या लाईनमधून गायब आहे. या घडामोडीमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इंग्लंड यासारख्या संघांचे सामने कराचीतील राष्ट्रीय स्टेडियममध्ये होतील.
सदर व्हिडिओ समोर आल्यानंतर आता नवा वाद उघडला आहे. भारतीय ध्वज का फडकवला गेला नाही यावर चर्चा सुरू झाली आहे. काही लोक असा युक्तिवाद करत आहेत की भारतीय संघ पाकिस्तानमध्ये कोणताही सामना खेळणार नाही, म्हणूनच हे केले असावे, पण हे तसेही धक्कादायकच आहे.
No Indian flag in Karachi: As only the Indian team faced security issues in Pakistan and refused to play Champions Trophy matches in Pakistan, the PCB removed the Indian flag from the Karachi stadium while keeping the flags of the other guest playing nations.
— Nawaz 🇵🇰 (@Rnawaz31888) February 16, 2025
- Absolute Cinema,… pic.twitter.com/2zmcATn7iQ
PCBने नियमांचे उल्लंघन केले का?
आयसीसीच्या नियमांनुसार, जर एखादा देश बहुराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करत असेल, तर त्याला त्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व देशांचे ध्वज फडकावावे लागतात. राजकीय तणाव आणि सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने त्यांच्या संघाला पाकिस्तानला जाण्याची परवानगी दिली नाही. यामुळे, आयसीसीने या स्पर्धेसाठी 'हायब्रिड मॉडेल' निवडले.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडसह ग्रुप अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. या गटात दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघ आहेत. प्रत्येक गटातून दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.
चॅम्पियन्स ट्रॉफीची शेवटची आवृत्ती 2017 मध्ये झाली होती, जी पाकिस्तानने जिंकली होती. पाकिस्तान पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन करत आहे. जर तुम्ही तसं पाहिलं तर, ही स्पर्धा आठ वर्षांनी पुनरागमन करत आहे. 'हायब्रिड मॉडेल' अंतर्गत, भारत आपले सर्व गट टप्प्यातील सामने दुबईमध्ये खेळेल. जर भारतीय टीमने पुढचा पडाव पार केला तर त्याचे सामने देखील दुबईमध्ये होतील.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक?
- 19 फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड - कराची
- 20 फेब्रुवारी - बांगलादेश विरुद्ध भारत - दुबई
- 21 फेब्रुवारी - अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका - कराची
- 22 फेब्रुवारी - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड - लाहोर
- 23 फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध भारत - दुबई
- 24 फेब्रुवारी - बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड - रावळपिंडी
- 25 फेब्रुवारी - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका - रावळपिंडी
- 26 फेब्रुवारी - अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड - लाहोर
- 27 फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश - रावळपिंडी
- 28 फेब्रुवारी - अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया - लाहोर
- 1 मार्च - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड - कराची
- 2 मार्च - न्यूझीलंड विरुद्ध भारत - दुबई
- 4 मार्च - सेमीफायनल-1 - दुबई
- 5 मार्च - सेमीफायनल- 2 - लाहोर
- 9 मार्च - फायनल - लाहोर (भारत अंतिम फेरीत पोहोचल्यास दुबईमध्ये खेळला जाईल)
- 10 मार्च - राखीव दिवस












Click it and Unblock the Notifications