विराट पुन्हा एकदा तोडू शकतो सचिन तेंडूलकरचा 'हा' विक्रम, न्यूझीलंडविरुद्ध इतिहास घडवणार का? वाचा
Champions Trophy 2025 IND vs NZ : टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. भारताने आपले दोन सामने जिंकले, एवढेच नाही तर मोठ्या फरकाने भारताने हे सामने जिंकले. भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भारतीय टीम सध्या जोरदार फार्मात आहे हे स्पष्टच आहे. पण आता पुढच्या मॅचमध्ये भारताचे काय होणार..टीम इंडियाची विजयी मालिका सुरुच राहणार का? हे आताच सांगणे कठिण आहे.
भारताचा न्युझीलंडविरुद्ध सामना होणार आहे. या सामन्याची रसिकांना प्रतिक्षा लागलेली आहे. या सामन्यात टीम इंडिया विजयासाठी सज्ज आहे. उपांत्य फेरीतील हा सामना विराट गाजवणार का हा प्रश्नही आता रसिकांना पडला आहे, कारण पाकिस्तानविरुद्ध तडाखेबंद शतक ठोकून विराटने आपला खेळ उंचावला आणि आपले इरादेही स्पष्ट केले आहेत, आता या सामन्यात विराट कोहलीकडे आणखी एक संधी चालून आलेली आहे.

विराटने मागच्या सामन्यात मोडला होता सचिनचा विक्रम
भारताचा पाकिस्तानविरोधात 23 फेब्रुवारी 2025 रोजी सामना झाला. या सामन्यात भारताने विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहली चमकला. त्याने शतक साजरे करत सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडला. कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 14 हजार धावा करणारा फलंदाज ठरला. सचिनपेक्षा कमी डावात त्याने हा आकडा गाठला होता. सचिनच्या 14 हजार धावांचा विक्रम कोहलीने मोडून इतिहास घडवला आहे.
सचिनचा आणखी एक विक्रम तोडण्याची कोहलीजवळ संधी
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरचा तो विक्रम मोडू शकतो. यावेळी कोहलीला बॅटने खेळण्यात यश आले तर तो सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडेल.
काय आहे सचिनचा विक्रम?
सचिनने किवी संघाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये 42 सामन्यांच्या 41 डावांमध्ये 1750 धावा केल्या आहेत. या काळात त्याने आपल्या बॅटने 5 शतके आणि 8 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे नाबाद 186 धावा आणि स्ट्राईक रेट 95 पेक्षा जास्त आहे. सरासरीबद्दल बोलायचे तर ते 46 पेक्षा जास्त आहे.
भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये किवी संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये कोहलीचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने 31 सामन्यांच्या समान डावात 1645 धावा केल्या आहेत. कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे नाबाद 154 धावा आणि सरासरी 95 पेक्षा जास्त आहे.
कोहली पुन्हा बाजी मारु शकतो?
सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यासाठी कोहलीला शतक झळकावे लागणार आहे. त्याचा फॉर्म चांगला असून त्याला दुबईच्या खेळपट्टी आणि मैदानाचीही माहिती आहे. अशा स्थितीत तो तेंडुलकरचा विक्रम मोडू शकतो. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यातील विजय किंवा पराभवाने फरक पडणार नाही कारण दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतकासाठी लागले 16 वर्षे
विराट कोहली 2009 मध्ये पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी खेळला होता. पण या स्पर्धेत विराटने पहिल्यांदाच शतक झळकावले. म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करण्यासाठी त्याला 16 वर्षे वाट पाहावी लागली. त्याच वेळी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर त्याने प्रथमच एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले आहे. याशिवाय, त्याने 531 दिवसांनंतर परदेशी भूमीवर एकदिवसीय शतक झळकावले आहे. म्हणजेच ही खेळी त्याच्यासाठी अनेक प्रकारे खास आहे.
पाकिस्तानविरुद्ध चौथ्यांदा 50 पेक्षा जास्त धावा
विराट कोहलीने आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध चौथ्यांदा 50 पेक्षा जास्त धावा केल्या. हाही एक विक्रमच आहे. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही खेळाडूला ही कामगिरी ३ पेक्षा जास्त वेळा करता आलेली नाही. विराट व्यतिरिक्त, व्हिव्ह रिचर्ड्स आणि सचिन तेंडुलकर यांनी पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी ३ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. याशिवाय आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत हा त्याचा २३ वा पन्नासपेक्षा जास्त स्कोअर राहिला. त्याच्याशिवाय फक्त सचिन तेंडुलकरला आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये इतक्या वेळा पन्नास पेक्षा जास्त धावा करता आल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications