Ind vs NZ : केन विल्यमसन की ग्लेन फिलिप्स? कुणाचा झेल होत अप्रतिम? काय म्हणतात एक्स्पर्ट, वाचा...
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आजच्या शेवटच्या स्टेज सामन्यात भारताविरुद्ध न्यूझीलंडमध्ये लढत सुरु आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ९ गड्यांच्या मोबदल्यात २४९ धावा केल्या. या सामन्यांत न्युझीलंडच्या केन विल्यमसन आणि ग्लेन फिलिप्स यांनी दोन जादूई झेल घेतले. या झेलचीच दिवसभर चर्चा होती. फिलिप्सच्या झेलमुळे विराट कोहलीला त्याच्या ३०० व्या वनडे सामन्यांत निराशा पहावी लागली. तर विल्यमसनने डावाच्या अखेरीस रवींद्र जडेजाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे या दोन्ही वेळेस मॅट हेन्री हाच गोलंदाजी करत होता. आता या दोन्ही झेलांमध्ये सर्वोत्कृष्ठ झेल कोणता, ही चर्चा सुरु झाली आहे.

सुरेश रैनाने केले कौतूक
भारतीय डावातील दोन मुख्य फलंदाज न्युझीलंडच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे आऊट झाले. भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक केले आणि त्यांना स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हटले. स्टार स्पोर्ट्सवरील मिड इनिंग्ज शोमध्ये बोलताना रैना म्हणाला, "ही स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणारी टीम आहे. प्रत्येक सामन्यात त्यांनी २०-२५ धावा वाचवल्या हे खरोखरच आश्चर्यकारक आहे."
WHAT A CATCH😲 From GLENN PHILLIPS
— blitz_cric (@DanyalB56) March 2, 2025
WOW#ChampionsTrophy2025 #INDvsNZ pic.twitter.com/MaTMY1cqLj
कोणता झेल होता सर्वोत्कृष्ट?
न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकांचे दोन्ही झेल 'पॉइंट' पोझिशनवर आले. हे दोन्ही झेल चॅम्पियन्स ट्रॉफी हॉल ऑफ फेममध्ये आहेत. परंतु ते भारताविरुद्धच्या एकाच सामन्यात आले आल्याने ते विशेष चर्चेत आलेत. ग्लेन फिलिप्सने भारताविरुद्ध जे केले तेच त्याने अलिकडेच स्पर्धेत केले आहे. पॉइंटवर उभे राहून, स्वतःला बाजूला झुकवत असताना त्याचे शरीर थोडे मागे वळले आहे याची खात्री करत हवेतून चेंडू पकडण्याची फिलिप्सची क्षमता अलौकिक आहे. रिकी पॉन्टिंग, पॉल कॉलिंगवूड, रवींद्र जडेजा आणि जॉन्टी रोड्स यांच्यासारख्या खेळाडूंमध्येही अशी क्षमता होती.
Kane williamson took a stunning catch. 😲#INDvsNZ #ChampionsTrophy2025 pic.twitter.com/EKiKdWAkWx
— ز ا ھ د (@subhukVaav) March 2, 2025
विल्यमसनचा झेलही अफलातून
फिलिप्सचा झेल इतका अप्रतिम होता, की त्याने रवींद्र जडेजा देखील आश्चर्यचकित केले. स्टॅन्डमध्ये जडेजाने हा झेल कसा झाला हे विराट कोहलीला समजावून सांगितले. एवढ्या कमी सेकंदात हा झेल कसा पकडला जावू शकतो, याची कृतीच जडेजाने विराटला दाखवली. दुसरीकडे, विल्यमसन नेहमीच एक चपळ क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो. परंतु मैदानात ब्लाइंडर्स घेऊ शकणारा खेळाडू म्हणून त्याची आत्तापर्यंत चर्चा झालेली नाही. वयाच्या ३४ व्या वर्षी, न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराने प्रेक्षकांना चकित केले. त्याने स्वतःला डावीकडे फेकले आणि रवींद्र जडेजाचा खूपच कमी वेळात झेल घेतला.
कोणाचा झेल सर्वोत्तम होता?
फिलिप्सची चेंडूवरची अँक्शन एखाद्या मांजरीसारखी होती. झेल घेण्यापूर्वी तो हवेत वळाला होता. दुसरीकडे, विल्यमसनला डावीकडे लांब डायव्ह मारावे लागले आणि तो चेंडू घासणार नाही याची खात्री करावी लागली. त्याच्या पिढीतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना, फिलिप्सने त्याचा झेल पूर्ण केल्यानंतर थक्क झाले. जो चेंडू चौकार जाणार होता, त्याच चेंडूवर फिलिप्सने विराट कोहलीला बाद केले. म्हणून हा पुरस्कार फिलिप्सला द्यायला हवा, असे काहींचे मत आहे.












Click it and Unblock the Notifications