Champions Trophy 2025 : विराट कोहली 46 धावा करताच 'हा' इतिहास रचणार! ख्रिस गेलचा मोठा विक्रम तोडणार
Champions Trophy 2025 IND vs NZ Final : चॅम्पियन ट्राॅफीत आज रविवारी, 9 मार्च 2025 रोजी अंतीम फेरीचा महामुकाबला रंगणार आहे. टीम इंडिया आणि न्युझीलंड संघात हा सामना होणार आहे. या सामन्याची सर्वच क्रीडा रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला इतिहास रचण्याची संधी मिळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहलीची कामगिरी दमदार राहिली आहे आणि आता तो ख्रिस गेलचा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आहे.

IND vs NZ final कोहली ख्रिस गेलचा विक्रम मोडेल
4 मार्च रोजी खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 98 चेंडूत 84 धावा करणाऱ्या विराट कोहलीकडून पुन्हा एकदा मोठी धावसंख्या अपेक्षित आहे. विराट कोहली अंतिम सामन्यात किमान 46 धावा करण्यात यशस्वी ठरला तर तो ख्रिस गेलचा विक्रम मोडेल आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरेल.
IND vs NZ विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये
क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 17 सामने खेळले आणि तीन शतके आणि एका अर्धशतकाच्या मदतीने 791 धावा केल्या. तर कोहलीने टीम इंडियासाठी चार मोसमात खेळलेल्या 17 सामन्यांमध्ये आतापर्यंत 746 धावा केल्या आहेत. विराट कोहलीला धावांच्या बाबतीत ख्रिस गेलला मागे टाकण्याची संधी आहे. विराट कोहली ज्या फॉर्ममधून जात आहे, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्येही तो बॅटने चमक दाखवेल अशी चाहत्यांना आशा आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटने शिखर धवनचा विक्रम मोडला
भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने शिखर धवनचा 701 धावांचा विक्रम मोडला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. आता विराट कोहलीला धावांच्या बाबतीत ख्रिस गेलला मागे टाकायचे आहे. याशिवाय कोहलीला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्याची संधी असेल. कोहलीने चालू स्पर्धेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या चार सामन्यांमध्ये 217 धावा केल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सध्या चौथ्या स्थानावर आहे.












Click it and Unblock the Notifications