चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये गोल्डन बॅट, बॉलचा, किताब कोणाला मिळणार ? हे खेळाडू आहेत प्रबळ दावेदार
IND vs NZ Final: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना भारत विरुध्द न्यूझीलंड यांच्यात आज 9 मार्च रोजी दुबई क्रिकेट आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या आज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही पुरस्कार दिले जातात.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला गोल्डन बॅटचा किताब दिला जातो तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला गोल्डन बॉलचा किताब दिला जातो. आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये गोल्डन बॅट विजेता आणि गोल्डन बॉल विजेता कोणाला मिळतो हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत दोन्ही संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, मग ते भारताचे असो किंवा न्यूझीलंडचे. या स्पर्धेत केवळ भारत आणि न्यूझीलंड संघांच्या खेळाडूंनीच नाही तर उर्वरित 6 संघांच्या खेळाडूंनीही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
गोल्डन बॅटसाठी हे खेळाडू आहेत प्रबळ दावेदार
सध्या गोल्डन बॅटसाठी न्युझीलंड संघाचा खेळाडू रचिन रविंद्र आघाडीवर आहे. रचिन रवींद्रने तीन सामन्यांमध्ये 226 धावा केल्या आहेत. आज अंतिम सामन्यात 37 धावा करुन बाद झाला आहे. अशा परिस्थितीत रचिन रवींद्रला गोल्डन बॅटसाठी सर्वात प्रबळ दावेदार मानला जात आहे.
या शर्यतीत दुसरा प्रबळ दावेदार भारताचा विराट कोहली आहे. विराट कोहलीने आतापर्यंत चार सामन्यांमध्ये 217 धावा केल्या आहेत आणि तो या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. अंतिम सामन्यात मोठी धावसंख्या उभारून विराट कोहली गोल्डन बॅट विजेता बनू शकतो. भारताच्या विराट कोहली व्यतिरिक्त, श्रेयस अय्यरलाही गोल्डन बॅट विजेता बनण्याची मोठी संधी आहे. श्रेयसने चार सामन्यांमध्ये 195 धावा केल्या आहेत, ज्यामुळे तो चौथ्या स्थानावर आहे आणि अजूनही शर्यतीत आहे. त्याच वेळी पाचव्या क्रमांकावर केन विल्यमसनचे नाव आहे, विल्यमसनने आतापर्यंत 191 धावा केल्या आहेत.
गोल्डन बॉलचा किताब कोणाला मिळणार?
गोल्डन बॉल विजेत्याबद्दल बोलायचं झालं तर न्यूझीलंडचा मॅट हेन्री सध्या या शर्यतीत आघाडीवर आहे. मॅट हेन्रीने आतापर्यंत चार सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. मॅट हेन्रीला अंतिम सामन्यात ड्राप करण्यात आलं आहे, कारण त्याला उपांत्य सामन्यात दुखापत झाली होती, ज्यामुळे तो अंतिम सामन्यातून बाहेर पडला आहे. दुसऱ्या क्रमांकावर मोहम्मद शमी आहे.
मोहम्मद शमीने चार सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर भारतीय वरुण चक्रवर्तीचे नाव आहे. त्याने दोन सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत गोल्डन बॉल विजेत्याच्या दावेदारांमध्ये भारताच्या दोन मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. आज संध्याकाळपर्यत समजेल की गोल्डन बॉलचा किताब कोण जिंकणार आहे.












Click it and Unblock the Notifications