Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs NZ : पावसाने फायनल सामना धुवून जाण्याची शक्यता? वाचा काय सांगते दुबईच्या स्टेडिअमचे हवामान

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना उद्या रविवारी होणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्यूझीलंड संघ सज्ज झाले आहेत. २००० मध्ये झालेल्या आयसीसी नॉकआउट स्पर्धेच्या विजेतेपदाच्या सामन्यात अंतिम फेरीत एकमेकांसमोर आले होते. आता २५ वर्षांनंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया जेवढी स्टार प्लेअर्सने भरली आहे, न्यूझीलंडचा संघही तेवढाच तगडा समजला जात आहे. उद्याच्या सामन्यात काय होईल, याच्या चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत.

ind vs nz final

कसे आहे दुबईचे हवामान?

दोन्ही संघ तसेच क्रिकेट चाहते या जेतेपदाच्या सामन्यासाठी सज्ज आहेत. परंतु उद्या दुबईमध्ये ढगाळ वातावरण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण असल्याने पावसामुळे या सामन्यात व्यत्यय येईल का? असे प्रश्न विचारले जात आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ढगाळ हवामान असूनही, सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नसल्याचे व्हेदर रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरू होईल आणि दुबईमध्ये तापमान ३४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिवस जसजसा पुढे जाईल तसतसे तापमान कमी होऊ शकते आणि दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

भारत एक प्रबळ दावेदार

या सामन्यांत भारताला प्रबळ दावेदार समजले जात आहे. मात्र किवी संघालाही कमी लेखता येत नाही. दुबईमध्ये लक्ष्यांचा पाठलाग करताना भारताने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना संघाने चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. त्यात विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. संघाने फक्त एकाच सामन्यात लक्ष्याचे रक्षण केले आणि ते न्यूझीलंडविरुद्ध होते. त्या सामन्यात फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने पाच विकेट्स घेतल्या ज्यामुळे संघाला यश मिळाले.

न्यूझीलंड संघही फॉर्ममध्ये

न्यूझीलंड संघासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीचा प्रवासही उत्तम राहिला आहे. भारताविरुद्धच्या गट फेरीतील पराभव वगळता, किवी संघाने संपूर्ण मालिकेत छाप पाडली आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. नंतर बांगलादेशला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. शेवटच्या चार सामन्यांमध्ये, न्यूझीलंडने स्पर्धेत अपराजित राहिलेल्या दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. उपांत्य फेरीत, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिशेल यांनी शानदार खेळी करत न्यूझीलंडला अंतिम फेरीत पोहोचण्यात यश मिळवून दिले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+