चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कुठे होणार भारत-पाकिस्तान सामना
Champions Trophy 2025: आयसीसीने पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक अखेर जाहीर केले आहे. ही स्पर्धा 2025 मध्ये पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळवली जाणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी कराची येथे होणार आहे. पाकिस्तानचा शेवटचा साखळी सामना 27 फेब्रुवारीला रावळपिंडीत बांगलादेशविरुद्ध होणार आहे.
भारत-पाक सामना कुठे होणार?
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या स्पर्धेबाबत भारत सरकारने टीम इंडियाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळे बीसीसीआयने ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित करण्याची मागणी केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये या मुद्द्यावरून वाद सुरू होता, त्यामुळे स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर होण्यास एक महिना उशीर झाला.

हायब्रीड मॉडेलमध्ये होणार टीम इंडियाचे सामने
हायब्रीड मॉडेलचा अर्थ असा होतो की, भारत आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यापेक्षा तिसऱ्या देशात सामने खेळण्याची शक्यता पाहत होता, तर इतर सामने पाकिस्तानमध्ये खेळवायचे होते. आता दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांमध्ये झालेल्या करारानंतर आयसीसीने या हायब्रीड मॉडेलला मान्यता दिली असून वेळापत्रकही अखेर जाहीर झाले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक
19 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची
20 फेब्रुवारी- भारत विरुद्ध बांगलादेश, दुबई
21 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची
22 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर
23 फेब्रुवारी-पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई
24 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी
25 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी.
26 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर.
27 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी.
28 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर.
मार्च 1- दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची.
2 मार्च- न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई.
4 मार्च- उपांत्य फेरी 1, दुबई
5 मार्च- उपांत्य फेरी 2, लाहोर
9 मार्च- अंतिम- लाहोर












Click it and Unblock the Notifications