PAK vs NZ: विल यंगने केली पाक गोलदांजाची चांगलीच धुलाई, चॅम्पियन्स ट्रॉफीत झळकावलं पहिले शतक
PAK vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना पाकिस्तान विरुध्द न्यूझीलंड यांच्यात कराची येथे खेळला जात आहे. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झालं.
कराचीच्या सपाट खेळपट्टीवर किवी संघाला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. डेव्हॉन कॉनवे आणि केन विल्यमसन स्वस्तात बाद झाले. त्यानंतर संघाचा डाव सावरत न्यूझीलंड संघाचा खेळाडू विल यंगने धमाकेदार शतक लगावलं आहे. यावर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हे पहिले शतक आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात विल यंगने पाकिस्तान गोलंदाजांची धुलाई करत त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील चौथे शतक झळकावलं आहे. जरी डॅरिल मिशेल 10 धावा काढून बाद झाला तरी त्याचा यंगच्या फलंदाजीवर कोणाताही परिणाम झाला नाही.
मिशेल बाद झाल्यानंतर, विल यंगने टॉम लॅथमसह डाव पुढे नेला आणि स्थिर राहिला. दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी शानदार शतकी भागीदारी करत किवी संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत केली. लॅथमनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोन्ही खेळाडूंनी पाकिस्तानी गोलदांजाची चांगलीच धुलाई केली आहे.
विग यंगचे चौथे एकदिवसीय शतक
विल यंगने एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचे चौथे शतक झळकावलं आहे. या 32 वर्षीय फलंदाजाने 107 चेंडूत आपले शतक पूर्ण केलं. यंगने आपला 41 वा एकदिवसीय सामना खेळत असून पहिल्यांदाच न्यूझीलंडबाहेर शतक झळकावलं आहे. त्याने 11 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने आपले चौथे शतक पूर्ण केले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत शतक झळकावणारा विल यंग न्यूझीलंड चौथा खेळाडू बनला
चॅम्पियन्स ट्रॉफीत शतक झळकावणारा विल यंग न्यूझीलंड चौथा खेळाडू बनला आहे. क्रिस केंर्स, नाथ एस्टल आणि केन विल्यमसन या दिग्गज खेळाडू यादी विल यंगची आता एंट्री झाली आहे. क्रिक केंर्सने 2000 साली नैरोबी येथे भारताविरुध्द नाबाद 102 धावांची खेळी केली होती. त्यानंतर नाथन एस्टलने 2004 मध्ये द ओवल येथे अमेरिका विरुध्द 145 धावाची खेळी केली होती. केन विल्यमसने एजबेस्टन येथे अमेरिका विरुध्द शतकी खेळी केली होती. तर आज चॅम्पियन्स ट्रॉफीत विल यंगने 2025 मध्ये पाकिस्तान विरुध्द कराची येथे 107 धावांची खेळी केली आहे.












Click it and Unblock the Notifications