ENG vs SA : इंग्लंड विरुध्द दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना कधी, कुठे, पहायचा? घ्या जाणून

Champions Trophy 2025, ENG vs SA : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत गट टप्पा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उद्या शनिवारी म्हणजेच (ता. 1 मार्च) रोजी स्पर्धेतील 11 व्या सामन्यात इंग्लंड विरुध्द दक्षिण आफ्रिकेचे संघ आमने सामने येणार आहेत.

अफगाणिस्तान विरुध्द 8 धावांनी पराभव झालेल्या इंग्लंडचा संघ चॅम्पियन्स ट्रॅाफी शेवटच्या सामन्यात तरी विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरेल. त्यामुळे इंग्लंड-दक्षिण आफ्रिका सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. हा सामना कराचीतील नॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे.

ENG vs SA

इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व जोस बटलर करेल तर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व टेम्बा बावुमा करेल. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडची कामगिरी आतापर्यंत निराशाजनक राहिली आहे. या स्पर्धेत त्यांनी त्यांचे दोन्ही सामने गमावले आहेत तर दक्षिण आफ्रिकेने एक सामना जिंकला आहे तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी उद्याचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे.

दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या सामन्यात ज्या पद्धतीने अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा पराभव केला आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. तर दुसरीकडे इंग्लंड संघाचा अफगाणिस्तानच्या संघाने अटीतटीच्या सामन्यात दारुण पराभव केला आहे. त्यामुळे त्यांचा उपांत्य फेरीचा प्रवास आता जवळजवळ संपला आहे.

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका हेड टू हेड रेकॉर्ड

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुध्द दक्षिण आफ्रिकेच्या हेड-टू-हेड रेकॉर्डनुसार दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदिवसीय 70 सामने खेळले आहेत. त्यापैकी इंग्लंड संघाने 30 सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय संघाने 34 सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला आणि 5 सामन्यांचा निकाल लागला नाही. त्यामुळे या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पगडा भारी राहिला आहे.

इंग्लंड संघ-जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अ‍ॅटकिन्सन, टॉम बँटन, हॅरी ब्रूक, रेहान अहमद, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल साल्ट आणि मार्क वूड.

दक्षिण आफ्रिका संघ- टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, मार्को जानसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी व्हॅन डेर ड्यूसेन आणि कॉर्बिन बॉश.

AFG vs Aus : तुमच्या मनातील प्रश्नांचे उत्तर

1. इंग्लंड विरुध्द दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना कधी होणार?

इंग्लंड विरुध्द दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना शनिवारी 1 मार्च रोजी होणार आहे.

2. इंग्लंड विरुध्द दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना कुठे होणार?

इंग्लंड विरुध्द दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना कराचीतील नॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे

3. इंग्लंड विरुध्द दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना किती वाजता सुरू होईल?

इंग्लंड विरुध्द दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी 2 वाजता होईल.

4. इंग्लंड विरुध्द दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना कुठे पाहायचा?

इंग्लंड विरुध्द दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स ट्रॉफी सामना शनिवारी (1 मार्च 2025) रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.30 वाजता JioStar नेटवर्क्सच्या स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स 18 चॅनेलवर थेट प्रसारणासह सुरू होईल, तर JioHotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग असेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+