Australia vs South Africa : आज आस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅच, कोण जिंकणार, जाणून घ्या अंदाज
Australia vs South Africa : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघात आज मोठी हायहोल्टेज लढत होणार आहे. या लढतीआधी झालेल्या पाच लढतीत आफ्रिकन संघ वरचढ ठरला आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघातील काही गोलंदाज दुखापतीने त्रस्त आहेत अशातच सामना कोण जिंकणार याचा अंदाज आपण आज जाणून घेणार आहोत.
आस्ट्रेलियन संघ ठरला सर्वात जास्त रनचेसर
ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत सर्वात जास्त रन चेस करणारा संघ ठरला आहे. इंग्लडविरुद्ध 352 धावांचे आव्हान कांगारुंनी सहज पार केले. त्यामुळे या संघाचा आत्मविश्वास अगदी शिखरावर आहे तर दुसरीकडे दक्षिण आफ्रीकन संघ विजयासाठी उत्सुक आहे. दक्षिण आफ्रिकेने कराचीमध्ये अफगाणिस्तानचे आव्हान मोडून काढले. त्यामुळे दोन्ही संघ वरचढ आहेत. एकमेकांचे पारंपारिक प्रतिस्पर्धीही आहेत.

Australia vs South Africa : मंगळवारी रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप बी सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने येतील. दोन्ही संघांनी स्पर्धेतील त्यांचे सुरुवातीचे सामने जिंकले आणि सलग दुसरा विजय त्यांना उपांत्य फेरीच्या जवळ नेईल.
हेही वाचा : Australia vs South Africa : ऑस्ट्रेलिया - द. आफ्रिकेत सामना, जाणून घ्या वेळ आणि कुठे बघाल मोफत मॅच?
कोणी किती सामने जिंकले, आज कोण जिंकणार
- आफ्रिकन आणि कांगारु संघात कोण जिंकेल याचा अंदाज अगदी तंतोतंत लावायचा झाल्यास दोन्ही संघाच्या आधीच्या कामगिरीवर नजर टाकणे आवश्यक आहे.
- द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 110 सामने खेळले आहेत.
- त्यापैकी 55 आफ्रिकन संघाने तर 51 कांगारूंनी जिंकले आहेत.
- गेल्या वेळी ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती.
AUS vs SA Dream11 ऑस्ट्रेलिया- दक्षिण आफ्रिका ड्रीम 11
विकेटकीपर- जोश इंग्लिस, क्लासेन
बॅट्समन- स्टीव्ह स्मिथ, टेम्बा बावुमा, ट्रॅव्हिस हेड, रॅसी व्हॅन डुसेन
अष्टपैलू- मॅक्सवेल, मार्को यान्सेन
गोलंदाज- ॲडम झाम्पा, कागिसो रबाडा, कॅपिसोड, नाथन एलिस
कप्तान - ट्रेव्हिस हेड, उपकप्तान रबाडा
ऑस्ट्रेलियन संघ
मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (कीपर), ॲलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन, शॉन ॲबॉट, ॲरॉन हार्डी, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, टॅन फ्रेझर.
आफ्रिकन संघ
रायन रिकेल्टन (रक्षक), टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सेन, विआन मुल्डर, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी, हेनरिक बॉस, हेनरिक बॉस.
हेही वाचा : Australia vs South Africa : आस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका संघात आतापर्यंत कुणी किती सामने जिंकले? वाचा












Click it and Unblock the Notifications