Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Champions Trophy 2025 : AUS VS SA ; कशी असेल खेळपट्टी? हवामान आणि पावसाचा अंदाज काय? वाचा सविस्तर

चॅम्पियन ट्राँफी-२०२५ मध्ये उद्या मंगळवारी एकदिवसीय विश्वचषक विजेचा ऑस्टेलिया संघ दक्षिण अफ्रिकेशी भिडणार आहे. रावळपिंडी क्रिकेट स्टेडिअम होणारा हा सामना चांगलाच हाय होल्टेज होणार आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या सामन्यात ३५२ धावांचा पाठलाग करत इंग्लंडचा पाच विकेट्सने पराभव केला होता. तर दक्षिण अफ्रिकेने त्यांच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा १०७ धावांनी पराभव केला.

Aus Vs SA

कुठे होणार सामना?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना मंगळवारी दुपारी २.३० वाजता होईल. या सामन्याचा टॉस भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता होईल. रावळपिंडी येथील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम तो खेळला जाईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स- १८ चॅनेलवर टीव्हीवर प्रसारित केला जाईल. तुम्ही जिओहॉटस्टारवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना लाईव्ह स्ट्रीम देखील करू शकता.

काय सांगते हवामान?

उद्या मंगळवारी रावळपिंडी येथे ५०% ते ७०% पर्यंत पावसाची शक्यता आहे. तापमान १५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. तापमान १४ ते २४ अंश सेल्सिअस पर्यंत असू शकते. थोडक्यात, हवामान अंदाजात पावसाची उच्च शक्यता दर्शविली आहे, ज्यामुळे सामन्यात व्यत्यय येऊ शकतो.

कशी असेल खेळपट्टी?

रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजीला अनुकूल समजली जाते. ही खेळपट्टी सपाट व चांगली उसळी घेणारी असल्याने मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते. खेळ जसजसा वाढत जातो तसतशी ही खेळपट्टी मंदावते. ज्यामुळे फिरकीपटूंनाही विकेट घेण्याची संधी मिळू शकते. या मैदानावर खेळल्या गेलेल्या अलिकडच्या काही सामन्यांत मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पाहिले गेले आहे. खेळपट्टीचे फलंदाजीला अनुकूल स्वरूप आणि दव पडण्याची शक्यता लक्षात घेता, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्यास प्राधान्य देऊ शकतो.

ऑस्ट्रेलिया संघ: ट्रॅव्हिस हेड, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), अ‍ॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, स्पेन्सर जॉन्सन, अ‍ॅडम झांपा.

दक्षिण आफ्रिका संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), रायन रिकेल्टन, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, विआन मुल्डर, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी

दोन्ही संघाचे समोरासमोर रेकाँर्ड

एकूण सामने: ११०
ऑस्ट्रेलिया जिंकले: ५१
दक्षिण आफ्रिका जिंकले: ५५
बरोबरी: ३
निकाल नाही: १

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+