AUS vs AFG: ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान 'करो या मरो' सामना, कोण सेमीफायनल तिकिट गाठणार?
AUS vs AFG Winner Prediction: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तान संघाने रोमांचक सामन्यात इंग्लंडचा पराभव करु उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. आता लीग स्टेजचा तिसरा आणि शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. हा सामना शुक्रवारी आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात स्पर्धा होईल आणि हा सामना 'करो या मरो' असा आहे. जर अफगाणिस्तान संघ जिंकला तर तो उपांत्य फेरीत जाईल. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया जिंकल्यास त्यांना उपांत्य फेरीचे तिकीट मिळेल.
ऑस्ट्रेलियाचे 3 गुण आहेत तर अफगाणिस्तानचे 2 गुण आहेत. दक्षिण आफ्रिका 3 गुणांसह अव्वल स्थानावर आहे आणि त्यांचा नेट रन रेट ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला आहे. आफ्रिकेचा एक सामना शिल्लक आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानमधील पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर पडतील. दोन्ही संघांसाठी 2 गुण महत्त्वाचे आहेत.

ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तानमध्ये कोण जिंकेल?
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानच्या हेड-टू-हेड रेकॉर्डनुसार दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदिवसीय इतिहासात फक्त 4 सामने खेळले आहेत. या 4 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघ विजयी झाला आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तानच्या एकदिवसीय संघाला आतापर्यंत एक ही विजय मिळवता आला नाही.या सामन्यासाठी आपण दोन्ही संघासाठी पन्नास-पन्नास टक्के संधी आहे, असं म्हणू शकतो.
टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाला केला आहे पराभव
टी-20 क्रिकेटमध्येही हे दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच आमनेसामने आले आहेत. 2022 च्या टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने एका रोमांचक सामन्यात 4 धावांनी विजय मिळवला होता, तर 2024 च्या टी-20 विश्वचषकात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव करत इतिहास रचला होता. दोन्ही संघ दोनदा एकमेकांसमोर आले आहेत आणि दोघांनीही प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. अशा परिस्थितीत शुक्रवारी जेव्हा अफगाणिस्तान संघ लाहोरमध्ये ऑस्ट्रेलियाशी सामना करेल, तेव्हा सामना हा सामना कोण जिंकेल हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.
गद्दाफी स्टेडियमच्या खेळपट्टीचा रिपोर्ट
आतापर्यंत, गद्दाफी स्टेडियमवरील मोठ्या धावसंख्येच्या खेळपट्टीने वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजांना फारशी मदत केलेली नाही. अशा परिस्थितीत या खेळपट्टीवर पुन्हा एकदा मोठी धावसंख्या होताना दिसू शकते. जेव्हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या मैदानावर आमनेसामने आले तेव्हा 350 हून अधिक धावांचा पाठलाग करण्यात आला. त्याचप्रमाणे अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात दोन्ही संघांना 300 पेक्षा जास्त धावा करण्यात यश आलं होतं. अशा परिस्थितीत अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात पुन्हा 300 पेक्षा जास्त धावा होऊ शकतात.
अफगाणिस्तान: रहमानउल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), आर शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), सेदिकुल्लाह अटल, इब्राहिम झदरान, गुलबदिन नायब, अझमतुल्लाह उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, फजलहक फारुकी, नूर अहमद
ऑस्ट्रेलिया: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, अॅडम झांपा.












Click it and Unblock the Notifications