Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Aus vs SA : ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामन्याआधी पावसाची बॅटींग! आता किती वाजता होणार टॉस? वाचा

Champions Trophy 2025 Aus vs SA Toss delayed : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना वेळेवर सुरू झाला नाही. महत्वाची बाब म्हणजे या सामन्याआधीच वरुणराजाने हजेरी लावली आहे. पावसाची जोरदार बॅटींग झाल्याने नाणेफेक अद्याप होऊ शकलेली नाही.

नाणेफेकीच्या तासाभरापूर्वी पावसाने मैदान व्यापले आणि मैदान ओले झाले आहे. हा सामना पावसामुळे विस्कळीत होईल, असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. ही शक्यता 62 टक्के होती आणि ती नाणेफेकीपूर्वीच खरी ठरली. नाणेफेकीची वेळ दुपारी 2 वाजेची असली तरी ती वेळेवर झाली नाही. पंच आणि सामनाधिकारी यांना नवीन वेळ ठरवावी लागेल.

Champions Trophy 2025 Aus vs SA

नाणेफेकीपूर्वी सुरू झाला पाऊस

नाणेफेकीपूर्वी सुरू झालेला पाऊस निर्धारित वेळेपर्यंत सुरूच होता, ज्यामुळे पंचांनी कोणताही निर्णय घेतला नाही आणि टॉसची वेळ निघून गेली. तथापि, हलक्या पावसातही, सुपर सोपर्सनी आउटफिल्ड कोरडे करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवले. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांसाठी हा सामना खूप खास आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाला उपांत्य फेरीच्या अगदी जवळ जाण्याची संधी मिळेल. सध्या ब गटातील उपांत्य फेरीतील संघांची स्थिती स्पष्ट नाही. दोन्ही संघ खूप मजबूत आणि तगडे दिसत आहेत.

ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत सर्वात जास्त रन चेस करणारा संघ ठरला आहे. इंग्लडविरुद्ध 352 धावांचे आव्हान कांगारुंनी सहज पार केले. त्यामुळे या संघाचा आत्मविश्वास अगदी शिखरावर आहे तर दुसरीकडे दक्षिण आफ्रीकन संघ विजयासाठी उत्सुक आहे. दक्षिण आफ्रिकेने कराचीमध्ये अफगाणिस्तानचे आव्हान मोडून काढले. त्यामुळे दोन्ही संघ वरचढ आहेत. एकमेकांचे पारंपारिक प्रतिस्पर्धीही आहेत.

मंगळवारी रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप बी सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने येतील. दोन्ही संघांनी स्पर्धेतील त्यांचे सुरुवातीचे सामने जिंकले आणि सलग दुसरा विजय त्यांना उपांत्य फेरीच्या जवळ नेईल.

  • कोणी किती सामने जिंकले, आज कोण जिंकणार
  • आफ्रिकन आणि कांगारु संघात कोण जिंकेल याचा अंदाज अगदी तंतोतंत लावायचा झाल्यास दोन्ही संघाच्या आधीच्या कामगिरीवर नजर टाकणे आवश्यक आहे.
  • द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 110 सामने खेळले आहेत.
  • त्यापैकी 55 आफ्रिकन संघाने तर 51 कांगारूंनी जिंकले आहेत.
  • गेल्या वेळी ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती.

AUS vs SA Dream11 ऑस्ट्रेलिया - दक्षिण आफ्रिका ड्रीम 11

विकेटकीपर - जोश इंग्लिस, क्लासेन

बॅट्समन - स्टीव्ह स्मिथ, टेम्बा बावुमा, ट्रॅव्हिस हेड, रॅसी व्हॅन डुसेन

अष्टपैलू - मॅक्सवेल, मार्को यान्सेन

गोलंदाज - ॲडम झाम्पा, कागिसो रबाडा, कॅपिसोड, नाथन एलिस

कप्तान - ट्रेव्हिस हेड, उपकप्तान रबाडा

ऑस्ट्रेलियन संघ

मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (कीपर), ॲलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन, शॉन ॲबॉट, ॲरॉन हार्डी, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, टॅन फ्रेझर.

आफ्रिकन संघ

रायन रिकेल्टन (रक्षक), टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सेन, विआन मुल्डर, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी, हेनरिक बॉस, हेनरिक बॉस,

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+