Champions Trophy : पावसामुळे AUS-AFG सामना अनिर्णीत: 16 वर्षानंतर ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये दाखल
Australia vs Afghanistan match cancelled due to rain : चॅम्पियन्स ट्रॉफी- 2025 मधील ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान सामना शुक्रवारी पावसामुळे रद्द करण्यात आला. यासह, ऑस्ट्रेलियन संघाने 16 वर्षांनंतर या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याचवेळी दुसरीकडे, अफगाणिस्तानच्या आशा शनिवारी कराची येथे होणाऱ्या इंग्लंड-दक्षिण आफ्रिका सामन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत. कारण, उद्याच्या सामन्यातील निर्णयावरुन अफगाणिस्तानचे भविष्य अवलंबून आहे.
शुक्रवारी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा डाव 273 धावांवर संपला. सेदिकुल्लाह अटलने 85 आणि अझमतुल्लाह उमरझाईने 67 धावा केल्या. बेन द्वारशीसने 3 विकेट घेतल्या.

274 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने एका विकेटच्या मोबदल्यात 109 धावा केल्या होत्या. मग पाऊस सुरू झाला आणि खेळ अखेर थांबवावा लागला. ट्रॅव्हिस हेडने 40 चेंडूत 59 धावा केल्या आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने 22 चेंडूत 19 धावा केल्या.
अनिर्णीत सामन्यानंतर कोणते 2 समीकरण दिसून येतात
ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरी गाठली. पावसामुळे सामना अनिर्णीत राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. ऑस्ट्रेलियाचे एकूण 4 गुण आहेत. या परिस्थितीत, संघाने उपांत्य फेरी गाठली आहे.
अफगाणिस्तान इंग्लंड-दक्षिण आफ्रिका सामन्यावर अवलंबून आहे. अफगाणिस्तानचे 3 गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेचेही 3 गुण आहेत. तथापि, नेट रन रेटमध्ये आफ्रिका पुढे आहे. जर दक्षिण आफ्रिकेने पुढचा सामना जिंकला तर अफगाणिस्तान बाहेर पडेल. त्याच वेळी, जर आफ्रिका मोठ्या फरकाने हरली तर अफगाणिस्तान टॉप-4 मध्ये पोहोचेल.
दोन्ही संघांचा प्लेइंग-11
ऑस्ट्रेलिया: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, अॅलेक्स कॅरी, जोश इंगलिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, स्पेन्सर जॉन्सन आणि अॅडम झांपा.
अफगाणिस्तान: हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झद्रान, रहमानउल्लाह गुरबाज, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, अझमतुल्लाह उमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, नूर अहमद आणि फजल-हक फारुकी.












Click it and Unblock the Notifications