Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आस्ट्रेलिया आणि अफगणिस्तान मॅचदरम्यान पाऊस आला तर कोण पोहचणार सेमीफायनलमध्ये? वाचा समीकरणे

Champions Trophy 2025 Aus vs Afg : आयसीसी चॅम्पियन ट्राॅफीमध्ये अ गटातून भारत आणि न्युझीलंड संघ सेमीफायनलमध्ये पोहचला, तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघाचा खेळ पावसाने वाया गेला. त्यानंतरच्या झालेल्या नवव्या सामन्यात 26 फेब्रुवारी 2025 रोजी अफगाणिस्तानने बुधवारी रात्री चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडचा पराभव करून सर्वांना धक्का दिला. त्यानंतर आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान मॅच होणार आहे.

या मॅचपुर्वी किंवा दरम्यान पाऊस आला आणि ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तान यांच्यातील सामना रद्द झाल्यास कोण सेमीफायनलमध्ये जाणार याची समि‍करणे आपण जाणून घेऊया.

Champions Trophy 2025 Aus vs Afg

सेमीफायनलचे समीकरण काय?

अफगणिस्तानचा पराभव झाला तर काय?

  • ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान मॅचमध्ये स्टीव्ह स्मिथच्या संघाने अफगाणिस्तानचा पराभव केल्यास उपांत्य फेरी गाठली तर अफगाणिस्तानला घरी जावे लागेल.
  • अफगाणिस्तानने हा सामना जिंकला तर ते उपांत्य फेरीत पोहोचेल.
  • ब गटातून उपांत्य फेरीत पोहोचणारा दुसरा संघ कोणता संघ ठरेल, हे दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यावर अवलंबून असेल.

ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला तर काय?

  • जर अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि त्यानंतर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले, तर अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी तीन गुण होतील आणि ज्याचा निव्वळ रनरेट चांगला असेल तो उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.

पावसामुळे सामना रद्द झाला तर..समीकरण काय?

  • पावसामुळे हा सामना रद्द झाला तर परिस्थिती आणखीनच रंजक होईल. ऑस्ट्रेलियाचे चार गुण असतील आणि उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान निश्चित होईल.
  • दुसरीकडे, अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडविरुद्ध कोणत्याही किंमतीत विजय नोंदवावा लागेल.
  • दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला, तर त्याचा पराभव मोठा नाही, अशी आशा बाळगावी लागेल, त्यामुळे अफगाणिस्तानपेक्षा आफ्रिकन संघाचा धावगती चांगला आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरी गाठतील.

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया हेड टू हेड रिकॉर्ड

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानच्या हेड-टू-हेड रेकॉर्डनुसार दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदिवसीय इतिहासात फक्त 4 सामने खेळले आहेत. या 4 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघ विजयी झाला आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तानच्या एकदिवसीय संघाला आतापर्यंत एक ही विजय मिळवता आला नाही.

ऑस्ट्रेलिया संघ- स्टीव स्मिथ (कर्णधार), सीन एबट, एलेक्स कैरी, बेन ड्वार्शुइस, नाथन एलिस, जेक फ्रेजर-मैकगर्क, आरोन हार्डी, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, स्पेंसर जॉनसन, मारनस लाबुशेन, मैथ्यू लौकिक, एडम जंपा, ग्लेन मैक्सावेल आणि.

अफगानिस्तान संघ- हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इब्राहिम जादरन, रहमानुल्लाह गुरबाज, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, इकराम अलीखिल, गुलबदीन नायब, अजमतुल्ला उमरजई, मोहम्मद नबी, राशि खान, नांग्याल खरोती, नूर अहमद, फजलहक फारद जालीक, नूर अहमद, फजलहक फाराद जालीकी,

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+