Australia vs England : अ‍ॅलेक्स कॅरी बनला 'सुपरमॅन', हवेत उडी घेत घेतला एक अद्भुत झेल, पाहा व्हिडीओ

Australia vs England, 4th Match: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या चौथ्या सामना ऑस्ट्रेलिया विरुध्द इंग्लंड सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियान संघाची फिल्डींग जबरदस्त राहिली आहे. या सामन्यात अ‍ॅलेक्स कॅरीच्या चमकदार क्षेत्ररक्षणाचे एक आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळालं आहे.

इंग्लंडचा डाव सुरू होताच बेन डकेट आणि फिल साल्ट फलंदाजीसाठी मैदानात आले, परंतु फिल साल्ट मोठी खेळी न करताच पॅव्हेलियनमध्ये परतला.

alex carey takes a sensational catch

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का दिला जेव्हा सॉल्टने द्वारशुइसच्या चेंडूवर हवाई शॉट खेळला त्यावेळी मिड-ऑफवर उभ्या असलेल्या अ‍ॅलेक्स कॅरीने एका हाताने एक शानदार झेल घेतला. सॉल्ट 10 धावा करुन बाद झाला. चॅम्पियन्स ट्रॉफीतील उत्कृष्ट झेल आहे.

कॅरी हा एक यष्टिरक्षक-फलंदाज आहे. या परिस्थितीत, क्षेत्ररक्षक म्हणून, त्याने त्याच्या कारकिर्दीतील पहिला आंतरराष्ट्रीय झेल घेतला. या शानदार झेलमुळे इंग्लंड संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), अ‍ॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, अ‍ॅडम झांपा, स्पेन्सर जॉन्सन.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप साल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+