Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Afg vs Eng Head to Head : इंग्लंडचे पारडे जड, मात्र अफगानिस्तानही कमी नाही, वाचा इतिहास

लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअमवर बुधवारी (२६ फेब्रुवारी) चॅम्पियन ट्राँफीत अफगानिस्तान व इंग्लंड यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही संघाने त्यांचे पहिले सामने गमावल्यानंतर आता करो या मरोच्या स्थितीत खेळणार आहेत. दोन्ही संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. अफगाणिस्तानच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने त्यांना १०७ धावांनी हरवले होते. तर इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच विकेटने पराभव पत्करावा लागला होता.

England vs Afghanistan

उद्या करो या मरोची स्थिती

यापूर्वीच्या सामन्यात रहमत शाहच्या ९० धावांच्या दमदार खेळीनंतरही अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेकडून १०७ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे, बेन डकेटच्या १६५ धावांच्या शानदार खेळीनंतरही इंग्लंडला ऑस्ट्रेलियाकडून पाच विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता. आता या दोन्ही संघांना विजय मिळवणे आवश्यक असल्याने, लाहोरमध्ये एक महत्त्वाचा सामना खेळण्याची प्रतीक्षा आहे.

अफगान- इंग्लंड समोरासमोरचा इतिहास

अफगाणिस्तान आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आत्तापर्यंत तीन वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये इंग्लंडने दोनदा विजय मिळवला होता. तर २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानने त्यांचा पराभव केला होता. अगदी अलिकडच्या सामन्याचा विचार केला तर, १५ ऑक्टोबर २०२३ रोजी दिल्ली येथे हे दोन्ही संघ भिडले होते. जिथे अफगाणिस्तानने इंग्लंडला ६९ धावांनी हरवले. त्याआधी, २०१९ च्या विश्वचषकात मँचेस्टरमध्ये १५० धावांनी आणि २०१५ च्या विश्वचषकात सिडनीमध्ये ९ गडी राखून इंग्लंडने अफगानिस्तानचा पराभव केला होता.

एकूण सामने:
अफगाणिस्तान विजय:
इंग्लंड विजय:
निकाल नाही:

एएफजी विरुद्ध इंग्लंड:

शेवटचे तीन सामने
१५ ऑक्टोबर २०२३ - दिल्लीत (एकदिवसीय विश्वचषक) अफगाणिस्तानने इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव केला.
१८ जून २०१९ - इंग्लंडने मँचेस्टरमध्ये (एकदिवसीय विश्वचषक) अफगाणिस्तानचा १५० धावांनी पराभव केला.
१३ मार्च २०१५ - सिडनीमध्ये (एकदिवसीय विश्वचषक) इंग्लंडने अफगाणिस्तानचा ९ गडी राखून पराभव केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+