Afg vs Sa: अफगणिस्तान विरुध्द साऊथ आफ्रिका सामना कधी, कुठे, पहायचा? घ्या जाणून
Champions Trophy 2025 , Afg vs Sa : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या तिसऱ्या सामना (ता.21 फ्रेबुवारी) शुक्रवारी अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने येणार आहेत. ग्रुप बी मध्ये अफगाणिस्तान विरुध्द दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा पहिला सामना आहे. हा सामना कराची येथील राष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.
अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व हशमतुल्लाह शाहिदी करत आहेत तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व टेम्बा बावुमा करत आहेत. कराचीमध्ये खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या तिसऱ्या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता ते जाणून घेऊया.

अफगाणिस्तान विरुध्द दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना कधी खेळला जाईल?
अफगाणिस्तान विरुध्द दक्षिण आफ्रिका यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा तिसरा सामना शुक्रवारी (21 फेब्रुवारी 2025) खेळला जाईल.हा सामना कराची येथील राष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार हा तिसरा सामना दुपारी 2:30 वाजता सुरू होईल. त्याआधी अर्धा तास दुपारी 2:00 वाजता नाणेफेक होईल.
अफगाणिस्तान विरुध्द दक्षिण आफ्रिका सामना तुम्ही कुठे पाहू शकता?
अफगाणिस्तान विरुध्द दक्षिण आफ्रिका सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वर टीव्ही चॅनेल्सवर लाईव्ह पाहू शकता.तसेच हा सामना तुम्ही JioHotstar अॅपवर सुध्दया सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. हे सामने हिंदी आणि इंग्रजीसह विविध भारतीय भाषांमध्ये प्रसारित केले जात आहे.
अफगाणिस्तान संघ: हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झद्रान, इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), रहमानउल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), सेदिकुल्लाह अटल, रहमान शाह (उपकर्णधार), अझमतुल्लाह उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, फरीह अहमद, फजलहक फारुकी, नांगेयालिया खारोटे, नवीद झद्रान, नूर अहमद.
दक्षिण आफ्रिका संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जॉर्जियो, मार्को जानसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी व्हॅन डर ड्यूसेन, कॉर्बिन बॉश.












Click it and Unblock the Notifications