Afg vs Eng : अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामना, कधी, कुठे पाहायचा ?
Afghanistan vs England : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या 8 व्या सामन्यात इंग्लंड विरुध्द अफगाणिस्तान संघ उद्या म्हणजे (ता.26 फेब्रुवारी) रोजी आमनेसामने येतील. हा ग्रुप बी चा सामना आहे. या दोन्ही संघांसाठी करा किंवा मरो अशी परिस्थिती असेल. दोन्ही संघांनी त्यांचे सुरुवातीचे सामने गमावले आहेत आणि उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांना हा सामना जिंकवा लागणार आहे.
अफगाणिस्तानला पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने एकतर्फी सामन्यात अफगाणिस्तानचा 107 धावांनी पराभव केला होता. त्याच वेळी, पहिल्या सामन्यात 351 धावा करूनही इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला.

जोश इंगलिसच्या शानदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 5 विकेट्सने पराभव केला. यावरून स्पष्ट होते की पहिल्याच सामन्यात इंग्लंडची गोलंदाजी खूपच खराब झाली. आता इंग्लंडला अफगाणिस्तानविरुद्ध जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे आहेत. इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा सामना तुम्ही कधी, कुठे आणि कसा पाहू शकता ते जाणून घेऊया...
AFG vs ENG : तुमच्या मनातील प्रश्नांचे उत्तर
1. अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामना कधी होणार?
अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामना शनिवारी 26 फेब्रुवारीला होणार आहे.
2. अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामना कुठे होणार?
अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे.
3. अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामना किती वाजता सुरू होईल?
अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी 2 वाजता होईल.
4. अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामना भारतात टीव्हीवर कसा पाहायचा?
अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफी सामना शनिवारी (26 फेब्रुवारी 2025) रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.30 वाजता JioStar नेटवर्क्सच्या स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स 18 चॅनेलवर थेट प्रसारणासह सुरू होईल, तर JioHotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग असेल.
अफगाणिस्तान संघ: हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झदरान, रहमानउल्लाह गुरबाज, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, इकराम अलीखिल, गुलबदिन नायब, अझमतुल्लाह उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, नांग्याल खरोती, नूर अहमद, फजलहक फारुकी, फरीद मलिक, नवीद झदरान. राखीव खेळाडू: दरविश रसूल, बिलाल सामी.
इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, टॉम बँटन, हॅरी ब्रूक, रेहान अहमद, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वूड.












Click it and Unblock the Notifications