Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ENG vs AFG Pitch Report : आज अफगणिस्तान विरुद्ध इंग्लड मॅच; कसे राहील हवामान आणि पिच रिपोर्ट, वाचा

Afghanistan vs England : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या 8 व्या सामन्यात इंग्लंड विरुध्द अफगाणिस्तान संघ उद्या म्हणजे (ता.26 फेब्रुवारी) रोजी आमनेसामने येतील. हा ग्रुप बी चा सामना आहे. या दोन्ही संघांसाठी करा किंवा मरो अशी परिस्थिती असेल. दोन्ही संघांनी त्यांचे सुरुवातीचे सामने गमावले आहेत आणि उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांना हा सामना जिंकवा लागणार आहे.

अफगाणिस्तानला पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने एकतर्फी सामन्यात अफगाणिस्तानचा 107 धावांनी पराभव केला होता. त्याच वेळी, पहिल्या सामन्यात 351 धावा करूनही इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला.

afghanistan vs england

जोश इंगलिसच्या शानदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 5 विकेट्सने पराभव केला. यावरून स्पष्ट होते की पहिल्याच सामन्यात इंग्लंडची गोलंदाजी खूपच खराब झाली. आता इंग्लंडला अफगाणिस्तानविरुद्ध जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे आहेत. इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा सामना तुम्ही कधी, कुठे आणि कसा पाहू शकता ते जाणून घेऊया...

लाहोरच्या खेळपट्टीचा पीच रिपोर्ट

लाहोरची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी जन्नत असल्याचं बोललं जातं. कारण याठिकाणी झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामन्यातील फलदांजी पाहिली असेल. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. येथे आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 75 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 37 वेळा विजय मिळवला आहे, तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने 36 वेळा विजय मिळवला आहे. येथे पहिल्या डावात सरासरी 255 धावा झाल्या आहेत तर दुसऱ्या डावात 220 पर्यंत धावा झाल्या आहेत.

दरम्यान हे फक्त कागदावर नोंदवलेले आकडे आहे. वास्तव असे आहे की येथे 351 धावा करूनही इंग्लंडला शेवटचा सामना जिंकता आला नाही. तसेच, संध्याकाळी दव पडल्यानंतर गोलंदाजांसाठी ते अधिक कठीण होऊ शकते. त्यामुळे, नाणेफेक जिंकणारा संघ येथे प्रथम गोलंदाजी करू इच्छितो.

अफगाणिस्तान संघ: हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झदरान, रहमानउल्लाह गुरबाज, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, इकराम अलीखिल, गुलबदिन नायब, अझमतुल्लाह उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, नांग्याल खरोती, नूर अहमद, फजलहक फारुकी, फरीद मलिक, नवीद झदरान. राखीव खेळाडू: दरविश रसूल, बिलाल सामी.

इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अ‍ॅटकिन्सन, टॉम बँटन, हॅरी ब्रूक, रेहान अहमद, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वूड.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+