Afg vs Aus: अफगणिस्तान विरुध्द ऑस्ट्रेलिया सामना कधी, कुठे, पहायचा? घ्या जाणून
champions trophy 2025, Afg vs Aus : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील 10 व्या सामन्यात उद्या (ता.28 फेब्रुवारी) रोजी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा संघ आमनेसामने येणार आहेत. ग्रुप बी मधील तीन संघांसाठी उपांत्य फेरीचा मार्ग अजूनही खुला आहे हे लक्षात घेता ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान यांच्यातील हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे.
या महत्त्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन एकदिवसीय क्रिकेट संघाची धुरा स्टीव्ह स्मिथकडे आहे. अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट संघाची धुरा हशमतुल्लाह शाहिदीकडे असणार आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. दोन्ही संघ अंतिम 4 मध्ये स्थान मिळविण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर ग्रुप बी मध्ये चारही संघांसाठी उपांत्य फेरीचा मार्ग खुला होता, परंतु कालच्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडच्या संघाचा पराभव करुन त्यांना स्पर्धेतून बाहेर ढकलं आहे. त्यानंतर आता फक्त ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान उपांत्य फेरीच्या स्पर्धेत आहेत. अफगाणिस्तानने ज्या पद्धतीने इंग्लंडच्या दिग्गज संघाला एक मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात 8 धावांनी पराभूत केले आहे. त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की ऑस्ट्रेलियन संघही अफगाणिस्तानच्या खेळाडूंना हलक्यात घेण्याची चूक करणार नाही.
अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया हेड टू हेड रिकॉर्ड
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानच्या हेड-टू-हेड रेकॉर्डनुसार दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदिवसीय इतिहासात फक्त 4 सामने खेळले आहेत. या 4 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघ विजयी झाला आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तानच्या एकदिवसीय संघाला आतापर्यंत एक ही विजय मिळवता आला नाही.
ऑस्ट्रेलिया संघ- स्टीव स्मिथ (कर्णधार), सीन एबट, एलेक्स कैरी, बेन ड्वार्शुइस, नाथन एलिस, जेक फ्रेजर-मैकगर्क, आरोन हार्डी, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, स्पेंसर जॉनसन, मारनस लाबुशेन, मैथ्यू लौकिक, एडम जंपा, ग्लेन मैक्सावेल आणि.
अफगानिस्तान संघ- हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इब्राहिम जादरन, रहमानुल्लाह गुरबाज, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, इकराम अलीखिल, गुलबदीन नायब, अजमतुल्ला उमरजई, मोहम्मद नबी, राशि खान, नांग्याल खरोती, नूर अहमद, फजलहक फारद जालीक, नूर अहमद, फजलहक फाराद जालीकी,
AFG vs Aus : तुमच्या मनातील प्रश्नांचे उत्तर
1. अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना कधी होणार?
अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना शनिवारी 28 फेब्रुवारीला होणार आहे.
2. अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना कुठे होणार?
अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे.
3. अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना किती वाजता सुरू होईल?
अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी 2 वाजता होईल.
4. अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना कुठे पाहायचा?
अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफी सामना शनिवारी (28 फेब्रुवारी 2025) रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.30 वाजता JioStar नेटवर्क्सच्या स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स 18 चॅनेलवर थेट प्रसारणासह सुरू होईल, तर JioHotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग असेल.












Click it and Unblock the Notifications