Celebrity Cricket League 2025: तेलुगू वॉरियर्ससमोर भोजपुरी दबंगची डाळ शिजलीच नाही; ७ विकेटने पराभव
भोजपुरी दबंग्स विरुद्ध तेलुगू वॉरियर्स : हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात भोजपुरी दबंग्सना तेलगू वाँरियर्सने सात विकेटने लोळवले. यापूर्वी मुंबई हिरोजचा ८ विकेटने पराभव करुन हैदराबादला आलेल्या भोजपुरी संघाचा आत्मविश्वास सातवे आसमानपर होता. मात्र तेलगू वाँरियर्सने त्यांची डाळ शिजू दिली नाही.

काय झाले सामन्यात?
नाणेफेक झाल्यानंतर तेलगू वाँरियर्सने फलंदाजी केली. तेलुगू वॉरियर्सची सुरुवात चांगली झाली नाही. संपूर्ण संघ पहिल्या डावात फक्त ८० धावांवर बाद झाला. तेलुगू वॉरियर्सचा कर्णधार अखिलने ४१ धावांची खेळी केली. पण तो संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवू शकला नाही. या डावात दबंगचा कर्णधार मनोज तिवारी आणि मनमोहन सिंग यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
दबंगची सुपर कामगिरी
फलंदाजीला आलेल्या भोजपुरी दबंग्सने पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली. पहिल्या डावात ४६ धावांची आघाडी घेतली. यामध्ये आदित्य ओझाची ६१ धावांची शानदार खेळी आणि अंशुमन सिंगची ४२ धावांची खेळी महत्त्वाची ठरली. ज्यामुळे भोजपुरी दबंग्सने पहिल्या डावात १२६ धावा केल्या. दबंगच्या या डावात सचिनने ३ विकेट्स घेतल्या. नंतर, ४६ धावांची आघाडी घेत असलेल्या तेलुगू वॉरियर्सने पुन्हा एकदा संयम साधला. अश्विन बाबूच्या ३६ आणि साम्बाच्या २६ धावांच्या जोरावर ६ गडी गमावून १३२ धावा केल्या.
दबंगसमोर ८६ धावांचे लक्ष
दोन्ही डावांत मिळून तेलुगू वॉरियर्सने भोजपुरी दबंग्ससमोर ८६ धावांचे लक्ष्य ठेवले. पण इथे भोजपुरी दबंग्सचा डाव डळमळीत झाला. संपूर्ण संघ फक्त ७९ धावांवर गारद झाला. या डावात, दबंग्सकडून उदय तिवारीने सर्वाधिक २५ धावा केल्या. परंतु तो आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. तेलुगू वॉरियर्सचा गोलंदाज सचिनने ३ आणि सांबाने २ बळी घेतल्या. सामना गमावल्यानंतर भोजपुरी दबंग्सचे मालक भरत रिझिन म्हणाले की, आमच्या संघाने दुसऱ्या सामन्यातही चांगली कामगिरी केली. खेळाच्या शेवटच्या क्षणी आम्ही मागे पडलो पण सामन्यात तेलुगू वॉरियर्सना कडक लढत दिली.












Click it and Unblock the Notifications