चर्चा तर होणारच..! ऑस्टेलियाविरुद्ध खेळणार नाही, कारण रोहित दुसऱ्यांदा 'पप्पा' होणार..?
मुंबई : भारतीय संघ नोव्हेंबर महिन्यात ऑस्टेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तेथे भारतीय संघ पाच कसोटी सामने खेळणार आहे. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधीच भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. बॉर्डर-गावसकर चषक मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे.
ऑस्ट्रेलियातील कसोटी सामन्यामध्ये रोहित शर्मा खेळणार नसल्याचे सांगितलं जात आहे. मात्र अचानक रोहित शर्मा माघार का घेत आहे, याबाबत चर्चा वाढली. रोहित शर्मा दुसऱ्यांचा बाबा होणार असल्याच्या चर्चा काहींनी सुरु केल्या. मात्र यासंदर्भातील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रोहितच्या वैयक्तीक कारणांसाठी तो माघार घेत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
रोहितची काही सामन्यांतून माघार
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पात्र होण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची नोव्हेंबरमध्ये होणारी ही मालिका, भारतीय संघाच्या दृष्टीने महत्वाची आहे. या मालिकेत पाच कसोटी सामने खेळण्यात येणार आहेत. या मालिकेतील कामगिरीवरच भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार की नाही, हे स्पष्ट होईल. मात्र आता रोहितच्या निर्णयामुळे भारतीय चाहत्यांना धक्का बसला आहे.

भारतीय संघाबरोबर किमान पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्मा सोबत नसेल, असं सांगण्यात येतंय. रोहित शर्मा काही वैयक्तिक कारणांमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या अती महत्त्वाच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने खेळणार नसल्याचे समोर आले आहे. याबाबत रोहित शर्माने अधिकृपणे कोणतीही घोषणा केलेली नसली, तरी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी मात्र यासंदर्भातील तपशील दिला.
बीसीसीआयनं दिलं स्पष्टीकरण
बीसीसीआयमधील सूत्रांनी रोहित शर्मा पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचं सांगितलं आहे. "भारतीय संघ नोव्हेंबरच्या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. पण रोहित या कसोटी मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचे आम्हाला समजले आहे. वैयक्तिक कारणास्तव आपल्याला पहिल्या 2 कसोटी सामन्यांमध्ये खेळता येणार नसल्याचं रोहितनं बोर्डाला कळवलं आहे. पण याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे," असं सूत्रांचं म्हणणं आहे.
रोहित दुसऱ्यांदा बाबा होण्याच्या चर्चा
गेल्या महिन्यात CEAT क्रिकेट रेटिंग पुरस्कार सोहळा झाला. या पुरस्कार सोहळ्यासाठी भारताच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासह पत्नी रितीका सजदेह हीदेखील उपस्थित होती. मात्र या कार्यक्रमदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत असल्याने रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाप होणार, असा दावा नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रोहित शर्मासोबत त्याची पत्नी रितिका सजदेह उपस्थित होती. या कार्यक्रमातील रितीकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रितीकाच्या या व्हिडीओवर चाहते 'ज्युनिअर हिटमॅन लवकरच येणार' अशी प्रतिक्रिया देत आहेत.
Junior Hitman 🔜🥹🧿🥹😭 pic.twitter.com/7CQCXsHy2i
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) August 23, 2024












Click it and Unblock the Notifications