खेळाडू आहे की नशेडी, दिग्गज क्रिकेटपटूकडे आढळला 9 किलो गांजा, विमानतळावर पोलिसांकडून अटक
Nicholas Kirton arrested: क्रिकेट विश्वातून एक मोठी समोर येत आहे. कॅनडा क्रिकेट संघाचा कर्णधार निकोलस किर्टनला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निकोलसला बार्बाडोसमधील ग्रँटली अॅडम्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. जमैका ग्लीनरच्या वृत्तानुसार किर्टन सध्या पोलिस कोठडीत असून सध्या त्याची चौकशी केली जात आहे.
निकोलस सोबत 20 पौंड (सुमारे 9 किलो) गांजा आढळून आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 2 एप्रिल रोजी सकाळी ग्रँटली अॅडम्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर खेळाडूला ताब्यात घेण्यात आलं आहे.

बार्बाडोसमध्ये 2015 मध्ये ड्रग्ज कायदे शिथिल करण्यात आले आहेत. तसेच गांजाला गुन्हेगारीमुक्त करण्यात आले आहे, त्यासाठी परवाना प्रणाली सुरू करण्यात आली. दोन औंस (सुमारे 57 ग्रॅम) पर्यंत गांजा वैयक्तिकरित्या बाळगणे हा गुन्हा मानला जात नाही, परंतु तो सार्वजनिक ठिकाणी बाळगल्यास दंड होऊ शकतो. पण दोन औंसपेक्षा जास्त गांजा बाळगणे अजूनही गुन्हा आहे. 9 किलोग्रॅम कायदेशीर मर्यादेपेक्षा अंदाजे 160 पट आहे. एका आंतरराष्ट्रीय संघाच्या कर्णधाराला बार्बाडोसमध्ये ड्रग्जशी संबंधित प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्याने क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली.
निकोलस किर्टन कोण आहे?
निकोलस किर्टन यांचा जन्म बार्बाडोसमध्ये झाला आहे. त्यांने बार्बाडोस अंडर-17 आणि अंडर-19 संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच वेस्ट इंडिजच्या 19 वर्षांखालील संघाच्या संघातही होता, मात्र त्याने संघासाठी कोणताही अधिकृत सामना खेळलेला नाही. निकोलस किर्टनच्या आईचा जन्म कॅनडामध्ये झाला होता, त्यामुळे किर्टन कॅनडाचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र ठरला. त्याने फेब्रुवारी 2018 मध्ये ओमानविरुद्ध कॅनडासाठी लिस्ट ए मध्ये पदार्पण केलं होतं.
जुलै 2023 मध्ये त्याला कॅनडाच्या एकदिवसीय आणि टी-20 संघांचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. किर्टनने कॅनडासाठी व्हाईट-बॉल दोन्ही फॉरमॅटमध्ये (एकदिवसीय आणि टी-20) 1,000 हून अधिक धावा केल्या आहेत आणि गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकातही भाग घेतला होता.
किर्टनने कॅनडासाठी 21 एकदिवसीय सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने 514 धावा केल्या आहेत. तसेच 28 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 627 धावा केल्या आहेत. 2020 मध्ये त्याने जमैका तल्लावाहसाठी तीन सीपीएल सामने खेळले होते. त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २३ मार्च रोजी विंडहोक येथे नामिबियाविरुद्धचा टी-20 सामना होता, जो आयसीसी पुरुष विश्वचषक लीग 2 दौऱ्यादरम्यान खेळला गेला होता. यासोबतच कार्लटन कॅनडाच्या विश्वचषक संघाचाही भाग होता.












Click it and Unblock the Notifications