पर्थमध्येही टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी, संपूर्ण संघ फक्त 150 धावांवर ऑलआऊट
India vs Australia, 1st Test: बॉर्डर गावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात भारतीय संघ 150 धावांवरचं ढेपाळला आहे. ऑस्ट्रेलियाच्या भेदक आणि धारदार गोलदांजीसमोर टीम इंडियाचे फलंदाजांनी गुडघे टेकले. संपूर्ण भारतीय संघ 49.3 षटकात केवळ 150 धावा करू शकला.
भारतीय फलंदाज सुरुवातीपासूनच त्रस्त दिसत होते. यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडिक्कल खाते न उघडताच पॅव्हेलियनचा रस्ता धरला. त्यानंतर विराट कोहली 5 धावा करून बाद झाला तर ध्रुव जुरेल 11 धावा करून बाद झाला.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी चाहत्यांची निराशा केली. यानंतर वॉशिंग्टन सुंदरनेही चार धावा करत बाद झाला. ऋषभ पंत आणि नितीश रेड्डी यांच्यात सातव्या विकेटसाठी 48 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली, पण पंत बाद होताच भारतीय डाव संपुष्टात आला. नितीशने सर्वाधिक 41 धावा केल्या, तर पंतने 37 धावांची खेळी केली. हर्षित राणा आणि जसप्रीत बुमराह अनुक्रमे सात आणि आठ धावा करून बाद झाले.
गोलंदाजांना ताकद दाखवावी लागेल
ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने भेदक आणि धारदार गोलदांजी करत चार बळी टिपले. तर मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि मार्श यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. या दमदार कामगिरीने ऑस्ट्रेलिया संघाचे डावावर पूर्णपणे वर्चस्व राहिलं. भारतीय गोलंदाजांना आता आपली ताकद दाखवावी लागणार आहे. विशेषत टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराहकडून मोठ्या अपेक्षा असतील.
ऑस्ट्रेलिया : उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.
भारत: केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.












Click it and Unblock the Notifications