सैफ अली खानला वडिलांचा क्रिकेटरचा वारसा असतानाही अभिनय क्षेत्र का निवडलं, सांगितलं हे कारण

Saif Ali Khan Stabbed: भारतीय संघाचे दिग्गज क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर काल मध्यरात्री 2.30 वाजेच्या सुमारास चाकू हल्ला करण्यात आला आहे. आज सकाळी सैफवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

हल्लेखोराने मध्यरात्री सैफच्या घरात घुसून चाकूने सपासपा 6 वार करत त्याला जखमी केले, त्यापैकी दोन वार गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे. आता सैफ यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. दरम्यान या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला असून वांद्रे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Saif Ali Khan

क्रिकेटच्या जगतात सैफच्या वडिलांचा वारसा असूनही त्याने कधीही क्रिकेटर होण्याचा मार्ग स्वीकारला नाही. एकीकडे त्याच्या वडिलांनी भारतीय क्रिकेटला नवीन उंचीवर नेले तर दुसरीकडे सैफने अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.

सैफला वडिलांसारखे क्रिकेटर व्हायचे नव्हते?

द ग्रेट इंडियन कपिल शो 2 च्या एका भागात अभिनेता सैफ अली खानने क्रिकेटपेक्षा अभिनयाची का निवड केली याचं गुपीत उघड केलं आहे. दिग्गज खेळाडू मन्सूर अली खान पतौडी यांचा मुलगा असूनही सैफने खुलासा केला की, 'मला माझ्या अभिनयाचे गुण माझ्या आई शर्मिलाजींकडून मिळाले आहेत.' खेळापेक्षा सिनेमाकडे आकर्षित झाल्याचे श्रेय त्याने त्याची आई शर्मिला टागोर यांना दिलं आहे.

सैफने होस्ट कपिल शर्मा शो च्या कार्यक्रमात चाहत्यांना त्याच्या करिअर निवडीबद्दल माहिती दिली. सैफने वडिलांच्या क्रिकेटचं कौतूक ही केलं आहे, पण आईच्या प्रभावामुळे त्याला अभिनयक्षेत्राकडे जास्त आकर्षित झाला. या चर्चेत त्यांच्या कुटुंबातील क्रिकेट आणि बॉलिवूड कनेक्शन बद्दल काही गोष्टी सांगितल्या.

या भागात जान्हवी कपूर आणि ज्युनियर एनटीआर देखील उपस्थित होते, जे सैफचे आगामी चित्रपट 'देवरा' मध्ये सहकलाकार आहेत. या तिघांनी चित्रपटाच्या सेटवरील मजेदार किस्से शेअर केले आणि शोमध्ये विनोदाने प्रेक्षकांची मने जिंकली.

क्रिकेट आणि बॉलिवूडमधील कुटुंबाचा वारसा

कपिल शर्मा आणि सैफ अली खानच्या संभाषणादरम्यान त्याने क्रिकेट आणि बॉलिवूडमधील त्याच्या कुटुंबाच्या समृद्ध वारशाबद्दल मोकळेपणाने बोलला. क्रिकेटचे सामने पाहायला फार आवडतात, मात्र आईच्या प्रभावामुळे तो नेहमीच अभिनयाकडे अधिक आकर्षित झाला असल्याचं, त्याने या शो मध्ये सांगितलं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+