टीम इंडियाला मोठा धक्का, बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर, त्याच्या जागी 23 वर्षीय खेळाडूला संधी
Jasprit Bhumrah : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ज्याची भीती होती अगदी तेच घडले आहे. जसप्रीत बुमराहला या स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले आहे. बुमराह बाहेर पडू शकतो अशी चर्चा यापूर्वीच लागलेली होती. आणि आता ते खरंच सत्य झालं आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी हा एक मोठा धक्का म्हणता येईल.
जसप्रित बुमराह सद्या पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर होता आणि त्याच्या खेळण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार होता. आता त्याच्या बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. बुमराहने टी-20 विश्वचषक आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी करण्यात यश मिळवले.

बुमराहच्या जागी 23 वर्षीय हर्षित राणाला संघात समाविष्ट केल्याच्या बातम्या आहेत. दुसरीकडे, यशस्वी जयस्वालच्या जागी वरुण चक्रवर्तीला टीम इंडियात आणल्याची बातमीही समोर आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी एका महत्त्वाच्या गोलंदाजाची अनुपस्थिती ही खरी चिंतेची बाब बनली आहे.
याबद्दल माहिती देताना बीसीसीआयने सांगितले की, बुमराह बाहेर आहे आणि त्याच्या जागी हर्षित राणा आला आहे. काही खेळाडूंना प्रवासी राखीव म्हणून संघात ठेवण्यात आले आहे. जयस्वाल, सिराज सारख्या खेळाडूंची नावे त्यात समाविष्ट आहेत.
🚨 NEWS 🚨
— BCCI (@BCCI) February 11, 2025
Fast bowler Jasprit Bumrah has been ruled out of the 2025 ICC Champions Trophy due to a lower back injury. Harshit Rana named replacement.
Other squad updates 🔽 #TeamIndia | #ChampionsTrophy https://t.co/RML5I79gKL
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
राखीव : यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे.












Click it and Unblock the Notifications