Ind-Aus सामन्यादरम्यान व्हायरल झालेली सुंदर मुलगी कोण?, Video पाहताच लोक म्हणाले- ही तर मिस्ट्री...
Beautiful girl who went viral at Dubai Stadium : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मंगळवारी दुबई स्टेडियमवर चॅम्पियन्स ट्रॉफीचा सेमीफायनल सामना पार पडला. यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला. तर फायनलमध्ये प्रवेश केला. दरम्यान, कालचा सामना पाहण्यासाठी स्टेडियमला प्रचंड गर्दी झाली होती.
यात एका सुंदर मुलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. स्टेडियमवरील कॅमेऱ्यात ती सुंदर मुलगी कैद झाली अन् त्यानंतर सोशल मीडियावर तिचे फोटो व व्हिडिओ व्हायरल झाले. टीम इंडियाची जर्सी घालून भारतीय खेळाडूंना चिअर करणाऱ्या या मुलीची आता ओळख पटली आहे.

आधीच्या मॅचच्या निकालवर लक्ष्य टाकू?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला उपांत्य सामना 4 मार्च (मंगळवार) रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दरम्यान, उपांत्य फेरीत स्टेडियममध्ये बसलेल्या एका 'सुंदर' मुलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. टीम इंडियाची जर्सी घातलेली ही मुलगी दुबई स्टेडियममध्ये तिचा फोन कॅमेरा वापरुन फोटो काढत होती.
Vo sab to theek hai per ye hai kon ? 🤔#INDvsAUS pic.twitter.com/ul88jyeHts
— 💗Pooja yadav (@Poojayadav206) March 4, 2025
तिचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता लोकांनी तिची ओळख सांगितली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या खाली आता चाहते कमेंट करू लागले आहेत. चाहत्यांनी उघड केले की ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध गेमिंग प्रभावकार पायल धारे आहे. जी ऑनलाइन 'पायल गेमिंग' म्हणून ओळखली जाते.
— Payal Gaming (@Payal_Dhaare) March 4, 2025
कोण आहे ती मिस्ट्री गर्ल पायल धारे
"पायल गेमिंग" म्हणून ऑनलाइन ओळखली जाणारी पायल धारे ही भारतातील टॉप महिला गेमर्सपैकी एक आहे. अलीकडेच, ती भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य सामन्यादरम्यान दुबई स्टेडियमवर दिसली होती, ज्यामुळे ती सोशल मीडियावर व्हायरल झाली.
बाकी सब ठीक है लेकिन ये viral girl कौन हैं,
— पूजा शर्मा (@RJpooja12) March 4, 2025
जिसे कैमरामैन इतना जूम करके दिखा रहा है? 😜😂
अब भारत कप लेकर ही रहेगा।#INDvsAUS#IndvsAusSemifinal #RohitSharma𓃵 #ViratKohli #ChampionsTrophy2025 pic.twitter.com/wfJBCn86AA
पायल ही मध्य प्रदेशची आहे. ती S8UL Esports ची लोकप्रिय स्ट्रीमर आहे, जी BGMI (बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया) साठी प्रसिद्ध आहे. तिचे YouTube वर 4 दशलक्षाहून अधिक सबस्क्राइबर आहेत. 2023 मध्ये, ती माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटली, ज्याची झलक व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली आहे.












Click it and Unblock the Notifications