Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; इशान किशन-यशस्वीला संधी, कोण बनले कर्णधार जाणून घ्या

India A squad for England tour : बीसीसीआयने शुक्रवारी, दि.16 मे रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी 20 सदस्यीय भारत अ संघाची घोषणा केली. बंगालचा सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनला (abhimanyu easwaran) संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. तर मालिकेसाठी अनेक अनुभवी खेळाडूंना बोलावण्यात आले आहे. या दौऱ्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिकाही खेळणार आहे.

यशस्वी जयस्वालला संधी मिळाली

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा यशस्वी जयस्वाल संघाचा भाग बनलेला आहे. राजस्थान रॉयल्सच्या शेवटच्या लीग सामन्याने त्याची आयपीएल कारकिर्द संपत असल्याने तो पहिल्या कसोटीपासून उपलब्ध असणार आहे.

अनुभवी क्रिकेटपटू करुण नायर, शार्दुल ठाकूर यांनीही संघात स्थान मिळवले आहे. दोन्ही क्रिकेटपटूंनी देशांतर्गत हंगामात शानदार कामगिरी केली आहे आणि आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी ते शर्यतीत आहेत.

england tour

करुण नायर परतला

विराट कोहलीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर, निवड समिती चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूच्या शोधात आहे. जो त्याच्या जागी करुण नायर हा योग्य खेळाडू असू शकतो.

करुण नायरला भारतीय संघात परतण्याची संधी मिळणे ही त्याच्या कारकिर्दीसाठी एक मोठी संधी आहे. गेल्या देशांतर्गत हंगामात, त्याने प्रथम श्रेणी आणि लिस्ट-A क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली, ज्यामध्ये त्याने 1600 हून अधिक धावा केल्या आणि 9 शतके केली.

या उत्कृष्ट कामगिरीनंतर, क्रिकेट तज्ज्ञ आणि चाहत्यांकडून त्याच्या टीम इंडियात पुनरागमनाची मागणी वाढली. भारत-इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी त्याला इंडिया-अ मध्ये संधी मिळाली ही त्याच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जर त्याने येथे चांगली कामगिरी केली तर भारतीय कसोटी संघात त्याचे स्थान निश्चित होऊ शकते.

भारत अ संघ, कोणाचा झाला समावेश?

अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, करुण नायर, ध्रुव जुरेल (उपकर्णधार/यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, इशान किशन (यष्टीरक्षक), मानव सुथार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, आकाश रंजन, खलंज अहमद, हर्सूल दीप, अनंत रंजन गायकवाड, सरफराज खान, तुषार देशपांडे, हर्ष दुबे, दुसरी बाब म्हणजे, शुभमन गिल आणि साई सुदर्शन दुसऱ्या सामन्यापूर्वी संघात सामील होतील.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+