BCCI Central Contract 2025: यादीत 'हे' 34 खेळाडू; रोहित- विराट कोणत्या श्रेणीत? धक्कादायक नावे कोणती
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा बहुप्रतिक्षित केंद्रीय करार आज जाहीर झाले. हा करार २०२४-२५ हंगामासाठी करण्यात आला. आजच्या करारात भारतीय क्रिकेट खेळाडूंना A+, A, B आणि C अशा चार श्रेणींमध्ये विभागण्यात आले. अपेक्षेप्रमाणे कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना ए प्लस श्रेणीत स्थान मिळाले.

केंद्रीय करारातील ठळक मुद्दे
श्रेयस अय्यर आणि इशान किशन हे करार यादीत परतले आहेत. ऋषभ पंत याचा ग्रेड ए मध्ये समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना अव्वल म्हणजेच ए+ श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. वरुण चक्रवर्ती, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, सरफराज खान आणि ध्रुव जुरेल या नवीन खेळाडूंचाही करारात समावेश करण्यात आला आहे.
🚨 𝗡𝗘𝗪𝗦 🚨
— BCCI (@BCCI) April 21, 2025
BCCI announces annual player retainership 2024-25 - Team India (Senior Men)#TeamIndia
Details 🔽https://t.co/lMjl2Ici3P pic.twitter.com/CsJHaLSeho
किती खेळाडूंना केले करारबद्ध?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २०२४-२५ च्या वार्षिक करारात एकूण ३४ खेळाडूंना संधी दिली आहे. बीसीसीआयच्या करार यादीतून वगळल्यानंतर एका वर्षानंतर इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी पुनरागमन केले आहे. या यादीत अनेक नावे आश्चर्यचकित करणारी आहेत. तर अनेक खेळाडूंना अपेक्षेप्रमाणे श्रेणी देण्यात आली आहे.
A+ श्रेणीत कुणाला संधी?
रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे चार क्रिकेटपटू A+ श्रेणीत कायम ठेवण्यात आले आहेत. २०२४ च्या विश्वचषकानंतर रोहित, विराट आणि जडेजा यांनी टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यामुळे, त्यांना अव्वल श्रेणीत स्थान मिळण्याची अपेक्षा नव्हती. परंतु हे तिघेही अव्वल श्रेणीत कायम राहिले आहेत.
कशी आहे यादी?
(A+ श्रेणी)
रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा,
(अ श्रेणी)
मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, ऋषभ पंत
(ब श्रेणी)
सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जैयस्वाल, श्रेयस अय्यर
(क श्रेणी)
रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड़, शिवम दुबे, रवी बिश्नोई, वाशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सैमसन, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान, नीतीश कुमार रेड्डी, ईशान किशन, अभिषेक शर्मा, आकाशदीप, वरुण चक्रवर्ती












Click it and Unblock the Notifications