PAK vs BAN : बांगलादेशने इतिहास रचला, पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा 10 विकेट्सनी उडवला धुव्वा!
Bangladesh Pakistan Test Series :पाकिस्तान विरुध्द बांगलादेश पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा 10 विकेट्सनी पराभव करून इतिहास रचला आहे. बांगलादेशकडून मुशफिकुर रहीमने 191 धावांची खेळी केली.
पाकिस्तानने पहिल्या डावात 6 विकेट्स गमावून 448 धावा केल्या होत्या. यानंतर संघाने डाव घोषित केला. त्यासाठी मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी शतकी खेळी खेळली.

रिझवानने 239 चेंडूत नाबाद 171 धावा केल्या. त्याने 11 चौकार आणि 3 षटकार मारले. शकीलने 141 धावांची खेळी केली. त्याने 9 चौकार मारले. सॅम अयुबने 56 धावांचे योगदान दिले. बाबर आझम काही विशेष करू शकला नाही. तो शून्यावर बाद झाला.
बांगलादेशचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
बांगलादेशने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. पहिल्या डावात सर्वबाद होईपर्यंत 565 धावा केल्या. बांगलादेशकडून मुशफिकुर रहीमने 191 धावांची खेळी केली. त्याने 341 चेंडूंचा सामना करताना 22 चौकार आणि 1 षटकार लगावला. याआधी सदमान इस्लामने 93 धावांची दमदार खेळी केली. इस्लामने 12 चौकार मारले. लिटन दासने अर्धशतक झळकावले. त्याने 78 बाॅल्सवर 56 धावा केल्या. त्याने 8 चौकार आणि 1 षटकार मारला. मेहदी हसन मिराजने 77 तर मोमिनुल हकने 50 धावांचे केल्या
पाकची खराब कामिगिरी
दुसऱ्या डावात पाकिस्तान टीमने कामगिरी अत्यंत खराब कामगिरी केली. मोहम्मद रिझवानशिवाय एकही फलंदाजाने चांगला फरफाॅर्म केला नाही. रिझवानने 80 चेंडूत 51 धावा केल्या. त्याने 6 चौकार मारले. ओपनर म्हणून शफिकने 37 धावा केल्या. त्याने 3 चौकार मारले. सॅम अयुब 1 धावा करून बाद झाला. बाबर आझम 22 धावा करून बाद झाला. त्याने 3 चौकार मारले. सौद शकील शून्यावर बाद झाला.












Click it and Unblock the Notifications