बाबर आझमने T-20 विश्वचषकात रचला इतिहास, धोनीचा 'तो' रेकॉर्ड मोडला
Mumbai: T20 विश्वचषक 2024 च्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तान संघाने आयर्लंडविरुद्ध विजय मिळवला. मात्र, पाकिस्तान संघाचे फलंदाज आयर्लंडविरुद्धही संघर्ष करताना दिसले. T-20 विश्वचषक 2024 मधील पहिले दोन सामने गमावल्यानंतर पाकिस्तान संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला होता.
पाकिस्तानला मिळाला विजय
पाकिस्तान संघाला आयर्लंडविरुद्ध विजयासाठी 107 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र पुन्हा एकदा पाकिस्तानच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. मात्र, कर्णधार बाबर आझम मैदानावर टिकून राहिला आणि संघाला विजयाकडे नेल्यानंतरच तो पॅव्हेलियनमध्ये परतला.

बाबर आझमने 34 चेंडूंचा सामना करत दोन चौकारांच्या मदतीने 32 धावा केल्या. बाबर आझमनेही आपल्या संथ खेळीने मोठा विक्रम केला आहे.
बाबरने मोडला धोनीचा विक्रम
बाबर आझम टी-20 विश्वचषकात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. बाबर आझमच्या नावावर आता १७ डावांमध्ये ५४९ धावा आहेत. याआधी या यादीत भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे नाव आघाडीवर होते.भारतीय संघाचा कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीने 29 डावात 529 धावा केल्या होत्या.
मात्र आयर्लंडविरुद्धच्या 32 धावांच्या खेळीने बाबर आझमने महेंद्रसिंग धोनीचा हा विक्रम मोडीत काढला आहे.
शाहीन शाह आफ्रिदीने तीन विकेट आणि इमाद वसीम तीन विकेट यांच्या घातक गोलंदाजीनंतर कर्णधार बाबर आझम नाबाद ३२ धावाच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने टी- २० वर्ल्ड कपच्या सामन्यात आयर्लंडचा तीन विकेट्स राखू पराभव केला.
विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर बाबर आझम म्हणाला
टी-२० विश्वचषकातून पाकिस्तानचा संघ बाहेर पडल्यानंतर बाबर आझमचे कर्णधारपद पुन्हा एकदा धोक्यात आले आहे. आयर्लंडविरुद्धचा सामना जिंकल्यानंतरही बाबर आझम आनंदी दिसत नव्हता. टी-२० विश्वचषकातून बाहेर पडल्याबद्दल त्याने खंत व्यक्त केली. बाबर आझम म्हणाला की, आमच्या संघात अनेक चांगले खेळाडू आहेत.
पण ते संघ म्हणून खेळण्यात अपयशी ठरले. पाकिस्तानी खेळाडूंच्या कामगिरीबाबत क्रिकेटच्या दिग्गजांमध्ये सतत वाद होत आहेत. या लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट संघात अनेक मोठे बदल केले जाऊ शकतात.












Click it and Unblock the Notifications