Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; 'हा' खेळाडू बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतून बाहेर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2 नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पाच कसोटी सामने होणार आहेत. त्याआधीच ऑस्ट्रेलिया संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन हा भारताविरुद्धच्या मालिकेतून आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. ग्रीनने यापूर्वी चांगली कामगिरी करत संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले होते. आता दुखापतग्रस्त झाल्याने तो ही मालिका खेळू शकणार नाही. कॅमेरून ग्रीनच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.

कॅमेरून ग्रीन संघासाठी महत्त्वाचा

ग्रीन हा त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजी आणि मधल्या फळीत दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. भारताविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला त्याची उणीव नक्की भासेल. ग्रीनला ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिनसन आणि भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सारखीच दुखापत झाली आहे. ग्रीनने या मालिकेतून माघार घेतल्याने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.

Cameron Green out of the series

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दुखापत

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कॅमेरून ग्रीनला दुखापत झाली. यानंतर उपचारादरम्यान केलेल्या स्कॅनमध्ये त्याला स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले. आता त्याने पाठीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. शस्त्रक्रियेनंतर बरे होण्यासाठी त्याला किमान 6 महिने लागणार आहेत. याच कारणामुळे तो भारताविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही तो बाहेर पडणे जवळपास निश्चित आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही फेब्रुवारीत पाकिस्तानमध्ये होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अहवालानुसार तो आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यताही कमी आहे.

कॅमेरून ग्रीनची कारकीर्द

कॅमेरून ग्रीनने 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पहिली कसोटी खेळली होती. तेव्हापासून तो संघाचा महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी 28 कसोटी सामन्यांमध्ये 1,377 धावा आणि 35 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने दोन शतके आणि 6 अर्धशतकेही झळकावली आहेत. ग्रीनने ऑस्ट्रेलियासाठी 28 एकदिवसीय आणि 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+