Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

क्रिकेट जगताला धक्का! ऑस्ट्रेलियाच्या 'या' दिग्गज गोलंदाजाने घेतली अचानक निवृत्ती; नेमकं काय घडलं!

Mitchell Starc Retires : ऑस्ट्रेलियाचा अनुभवी व वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 35 वर्षीय स्टार्कने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. त्याने तात्काळ प्रभावाने टी-20 फॉरमॅटला अलविदा केला आहे.

Mitchell Starc Retires

निवृत्तीचे नेमकं कारण काय?

स्टार्कने स्वतःच त्याच्या या निर्णयामागील कारण स्पष्ट केले आहे. तो म्हणाला, "कसोटी क्रिकेट माझ्यासाठी नेहमीच सर्वात महत्त्वाचे राहिले आहे." ऑस्ट्रेलियासाठी खेळलेला प्रत्येक टी-20 सामना माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती, विशेषतः 2021 चा विश्वचषक, जो आम्ही जिंकला. तो विजय आणि संपूर्ण संघाचा प्रवास खूप खास होता.

स्टार्कने त्याच्या कारकिर्दीत 65 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, तो 2021 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा महत्त्वाचा भाग होता.

79 विकेट्ससह, तो सध्या ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी टी-20 गोलंदाज आहे. 2022 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 4 विकेट्ससाठी 20 धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिक्रिया!

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी स्टार्कच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "स्टार्कला त्याच्या टी-20 कारकिर्दीचा अभिमान असेल. तो 2021 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा एक महत्त्वाचा सदस्य होता आणि त्याने त्याच्या गोलंदाजीने खेळाची सुरुवात करण्याची क्षमता दाखवली."

या निवृत्तीनंतर आता स्टार्क २०२६ मध्ये होणाऱ्या पुढील टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या योजनांमध्ये नसणार. तो गेल्या एक वर्षापासून टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला नाही.

त्यामुळे, कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे त्याने ठरवले आणि हा निर्णय घेतला. आता ऑस्ट्रेलियन संघ न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. दुखापतीमुळे पॅट कमिन्स या मालिकेतून बाहेर असून, संघाचे नेतृत्व मिचेल मार्श करत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+