India Vs Japan : भारतीय हॉकी संघाची दमदार कामगिरी; गोलचा मारा, अन् जपानचा दारुण पराभव
India vs Japan, Asian Champions Trophy : भारतीय हॉकी संघ सद्या उत्तम फरफॉर्मन्समध्ये आहे. गेल्या काही वर्षातील त्यांची कामगिरी सातत्याने कमालीची पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. पहिल्यांदाचा चीनचा पराभव केला. तर सलग दुसऱ्या सामन्यात दमदार कामगिरी पूर्ण केली.
जपानसोबतच्या सामन्यात भारतीय संघाने पूर्वार्धात आपली क्षमता सिद्ध केली. भारताने सुरुवातीलाच गोल करत आघाडी घेतली. भारतासाठी पहिला गोल सुखजित सिंगने केला. यानंतरही भारतीय संघ थांबला नाही आणि आगेकूच सुरूच ठेवली.

अभिषेकने भारतासाठी दुसरा गोल केला आणि आघाडी घेतली. भारतीय आक्रमणासमोर जपानचा संघ असहाय दिसत होता आणि भारतानेही पूर्वार्धात तिसरा गोल केला. तिसरा गोल पेनल्टी कॉर्नरवरून झाला. हरमनप्रीत आणि संजयने मिळून एक गोल केला आणि तिसऱ्या गोलची आघाडी झाली. इथे पूर्वार्ध संपतो. मात्र, तिसऱ्या क्वार्टरमध्ये जपानने हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला आणि एक गोल केला. यामुळे स्कोअर 3-1 असा झाला.
India in cruise control against 🇯🇵#TeamIndia easing towards victory as Sanjay scores a mean flick past the Japanese Goalkeeper giving 🇮🇳 a 3️⃣-goal lead 🔥
— Sony LIV (@SonyLIV) September 9, 2024
Watch Hockey #AsianChampionsTrophy, LIVE NOW on #SonyLIV 📲 pic.twitter.com/szgFoFtGhC
शेवटच्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने पुन्हा प्लॅनिंग केले. या क्वार्टरमध्ये भारताचा चौथा गोल जर्मनप्रीत आणि उत्तम यांच्या समन्वयातून झाला. उत्तमने जर्मनच्या पासचे डीच्या आत रूपांतर केले आणि स्कोअर 4-1 असा केला. यानंतर सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला सुखजीतने भारतासाठी गोल केला आणि भारताने हा सामना 5-1 असा जिंकला. अशा प्रकारे भारताने सलग दुसरा सामना देखील स्वत:च्या खात्यावर केला.












Click it and Unblock the Notifications