Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Asia Cup :आशिया कपमध्ये सर्वात बलाढ्य संघ कोणता? भारत-पाकसह अन्य संघांची घोषणा, कोण-कोण खेळणार? वाचा

Asia Cup 2025 Which team strongest India Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष आणि तणावाच्या स्थितीमुळे यंदा आशिया कप स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट होते पण आता ही स्पर्धा येत्या ९ सप्टेंबर २०२५ पासून सुरु होत आहे. आशिया कप स्पर्धा संयुक्त अरब अमिराती-युएईमध्ये होत आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे, परंतु भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पाहता ही स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी खेळण्यासाठी खेळण्यासंदर्भात निश्चित झालेले आहे.

एकीकडे भारतीय संघ विजेतेपदासाठी प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानी, श्रीलंकन संघ या स्पर्धेत चूरस निर्माण करत आहेत. त्यातच आता अनेक देशांनी आपापल्या संघांची, खेळाडूंची यादी स्पर्धेसाठी जाहीर केली आहे, भारतानेही आपल्या संघ जाहीर केला असून यंदा प्रथमच टी-20 वर्ल्ड कपच्या धर्तीवर आशिया कप स्पर्धाही 20-20 षटकांची होणार आहे.

Asia Cup 2025 Which team strongest India Pakistan

9 सप्टेंबरपासून आशिया कप स्पर्धेचा महामुकाबला

आशिया कप स्पर्धेचा महामुकाबला 9 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे भारताकडून सूर्यकुमार यादव भारतीय संघाचा नेतृत्व करेल, तर शुभमंगल उपकर्णधार म्हणून यंदा आशिया कप मध्ये प्रथमच आपली कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघाशिवाय बांग्लादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग या संघाची घोषणा त्या- त्या देशाच्या क्रिकेट बोर्डाने केली आहे, तर श्रीलंका, युएई, ओमान या संघांची खेळाडूंची यादी अजून जाहीर झालेले नाही.

कोणत्या गटात कोणते संघ

ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, युएई आणि ओमान हे संघ आहेत, तर ग्रुप बी मध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान, हाँगकाँग, बांग्लादेश हे संघ आहेत, चला तर एक नजर टाकूया विविध देशांच्या क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या संघावर...

भारतीय संघ

कर्णधार: सूर्यकुमार यादव

फलंदाज: शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंह

यष्टिरक्षक: जितेश शर्मा, संजू सॅमसन

फिरकीपटू: अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव

जलद गोलंदाज: जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, हर्षित राणा

पाकिस्तान संघ (Pakistan)

कर्णधार: सलमान अली आगा

अष्टपैलू: अबरार अहमद, फहीम अशरफ, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर

फलंदाज: फखर जमान, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, साहिबजादा फरहान, सैम अयूब

यष्टिरक्षक: मोहम्मद हारिस

गोलंदाज: हारिस रऊफ, हसन अली, सलमान मिर्झा, शाहीन शाह आफ्रिदी, सुफयान मोकीम

अफगाणिस्तान संघ (Afghanistan)

कर्णधार: राशिद खान

फलंदाज: रहमानुल्लाह गुरबाझ, इब्राहिम जादरान, दरवेश रसूली, सिदीकुल्लाह अताल

अष्टपैलू: अजमतुल्लाह उमरजई, करीम जनत, मोहम्मद नबी, गुलबदीन नैब, शराफुद्दीन अशरफ

यष्टिरक्षक: मोहम्मद इसहाक

गोलंदाज: मुजीब उर रहमान, अल्लाह ग़ज़नफ़र, नूर अहमद, फरीद मलिक, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी

बांगलादेश संघ (Bangladesh)

कर्णधार: लिटन दास

फलंदाज: तंज़ीद हसन, परवेज़ हुसैन एमोन, सैफ हसन, तौहीद हृदॉय, जाकिर अली अनिक, शमीम हुसैन

यष्टिरक्षक: क़ाज़ी नुरुल हसन सोहन

अष्टपैलू: शाक माहीदी हसन, रिशाद हुसैन, शैफ उद्दीन

गोलंदाज: नासुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तंज़ीम हसन साकिब, तास्किन अहमद, शोरफुल इस्लाम

हाँगकाँग संघ (Hong Kong)

कर्णधार: यासिम मुर्तज़ा

फलंदाज: बाबर हयात, झीशान अली, नियाझाकत खान मोहम्मद, नसरुल्ला राणा, मार्टिन कोएट्जी, अंशुमान रथ, किंचित शाह

यष्टिरक्षक: काल्हान मार्क चाल्लू

गोलंदाज: आयुष आशीष शुक्ला, मोहम्मद ऐजाज खान, अतीक-उल-रहमान इकबाल, आदिल महमूद, हारून मोहम्मद अर्शद, अली हसन, शाहिद वासिफ, गजनफर मोहम्मद, मोहम्मद वहीद, अनस खान, एहसान खान

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+