Asia Cup भारत vs ओमान सामन्यात 2 भारतीय कर्णधार आमने-सामने; कोण जिंकणार? वेळ, संभाव्य संघ जाणून घ्या
Asia cup 2025 india vs oman todays match updates : आशिया चषकातील अ गटातील शेवटचा साखळी सामना भारत आणि ओमान यांच्यात होत आहे. हा सामना भारताच्या दृष्टीने फारसा महत्वाचा नाही. कारण यापुर्वीच भारताने सुपर ४ फेरी गाठली आहे. त्यामुळे हा सामना औपचारिक मानला जात आहे. बलाढ्य भारतीय सघांसमोर ओमानचा संघ दुबळा आहे. या सामन्यात भारताला विजयाची मोठी संधी आहे.

आशिया चषकात आजच्या सामन्यात टॉससाठी दोन भारतीय कर्णधार मैदानात उतरणार आहेत, हे विशेष.. एकीकडे टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या हातात आहे, तर दुसरीकडे ओमान संघाचा कर्णधारही मूळचा भारतीय खेळाडू आहे. त्यामुळे ही लढत मैत्रीपुर्ण होईल पण दुसरीकडे ओमानचा संघ विजयासाठी अधिक कसोशीने मैदानात उतरेल.
कधी आहे सामना? कुठे पाहता येईल..
ओमान आणि भारत यांच्यात आज १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता अबु धाबी या ठिकाणी सामना होणार आहे. या सामन्याची नाणेफेक सायंकाळी साडेसात वाजता होईल.
भारत आणि ओमान यांच्यातील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे, हा सामना आज सोनी स्पोर्ट्स नेटवर्क, सोनी लिव्ह वेबसाईट आणि मोबाईल Apps वर पाहता येणार आहे.
भारताचा संभाव्य संघ
शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग/जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
ओमानचा संभाव्य संघ
अमीर कलीम, जतिंदर सिंग (कर्णधार), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला (यष्टीरक्षक), वसीम अली, हसनैन शाह, शाह फैसल, जितन रामानंदी, आर्यन बिश्त, शकील अहमद, समय श्रीवास्तव
आजचा सामन्यात कोण वरचढ?
भारत आणि ओमान यांच्यातील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असल्यामुळे दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत कोणतीही टक्कर झालेली नाही. या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड आहे आणि त्यांचा सहज विजय होईल अशी अपेक्षा आहे. जर ओमानने टीम इंडियाला हरवले, तर तो क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा उलटफेर ठरेल.
कोण आहे ओमान संघाचा भारतीय कर्णधार
ओमान संघाचे नेतृत्व करणारा खेळाडू दुसरा-तिसरा कोणी नसून जतिंदर सिंग हा आहे. पंजाबमधील लुधियाना येथे १९८९ साली जन्मलेला जतिंदर सिंग, आता ओमान क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. त्याचे वडील १९७५ मध्ये नोकरीसाठी ओमानला गेले होते. जतिंदरने ओमानमध्येच शिक्षण घेतले आणि सध्या तो 'खिमजी रामदास कंपनी'च्या सेल्स विभागात काम करतो.












Click it and Unblock the Notifications