आर. अश्विनची मैदानावर महिला पंचासोबत धक्कादायक कृती! स्वतःला बॅटने कसे मारुन घेतले बघा व्हिडिओ
Ashwins Unexpected act on field : तामिळनाडूमध्ये प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा सुरु असून तिथे एक अनपेक्षित घटना पाहायला मिळाली आहे. माजी भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनभोवती ही घटना फिरत असून अश्विनने मैदानावर गोंधळ निर्माण केला आणि महिला पंचांशीही वाद घातला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
जेव्हा अश्विन बॅटींग करत होता त्यावेळी त्याला बाद देण्यात आले. यानंतर अश्विनची कृती अनपेक्षित होती. आऊट दिल्यानंतर अश्विनची प्रतिक्रिया त्याच्या देहयष्टी आणि संवादातून आली आहे.

भारताचा दिग्गज फिरकीपटू आर. अश्विन तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये डिंडीगुल ड्रॅगन्सकडून खेळत आहे. तो या संघाचा कर्णधार देखील आहे. एलबीडब्ल्यू दिल्यानंतर, तो पॅव्हेलियनकडे जाण्यापूर्वी महिला पंचांशी वाद घालताना दिसला. त्याचा तीव्र राग दिसून आला.
Ash அண்ணா Not Happy அண்ணாச்சி! 😶🌫
— Star Sports Tamil (@StarSportsTamil) June 8, 2025
📺 தொடர்ந்து காணுங்கள் | TNPL 2025 | iDream Tiruppur Tamizhans vs Dindigul Dragons | Star Sports தமிழில் #TNPLOnJioStar #TNPL #TNPL2025 pic.twitter.com/Csc2ldnRS3
नेमका प्रकार काय झाला?
तिरुपूर तमिझान्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान अश्विनला आऊट दिल्यानंतर पंच कृतिका वेंकटेशन यांनी अश्विनला बाद घोषित केले, पण अश्विनला ही गोष्ट रुचली नाही, त्याला आऊट दिलेले मान्य नव्हते आणि तो स्वीकारण्यास तयारही नव्हता. अश्विनला वाटले की चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता आणि म्हणूनच त्याला बाद देण्याचा निर्णय योग्य नव्हता.
अश्वीन महिला पंचाला काय म्हणाला?
अश्विनने महिला पंचांना सांगितले की, गोलंदाजाने स्टंपवरून चेंडू टाकला होता, ज्यामुळे चेंडू सहजपणे लेग स्टंपच्या बाहेर पडला, ही बाब पंचांनी मान्य केली नाही.
अश्वीनने केला राग-राग
रविचंद्रन अश्विनने आपला राग काढला मैदानाबाहेर जाताना, अश्विनने आपला राग काढला आणि बॅटने स्वतःच्या पायालाही मारले. या घटनेनंतर, अश्विनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
रविचंद्रन अश्विन या सामन्यात सलामीवीर म्हणून खेळत होता, तो बाद झाल्यावर त्याच्या संघाची परिस्थिती आणखी बिकट झाली. डिंडीगुल संघ एकूण 93 धावांवर बाद झाला. प्रत्युत्तर डावात खेळताना, तुषार राहेजाच्या नाबाद 65 धावांमुळे तिरुप्पूरने 9 विकेट्सनी सहज विजय मिळवला. डिंडीगुलचा या स्पर्धेतला हा पहिलाच पराभव आहे.












Click it and Unblock the Notifications