Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

स्टेडिअमवर 'नैनो से मिले नैना' अन् 7 दिवसांत 7 जन्माच्या गाठी.. आशिष नेहराची लव्हस्टोरी 'लै भारी'

टीम इंडियाचा माजी स्टार गोलंदाज आणि सध्याच्या गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहरा जेवढा चर्चेत असतो, तेवढीच त्याची पत्नीही चर्चेत असते. आपल्या धोकादायक यार्करने फलंदाजांना धडकी भरवणारा हा गोलंदाज, मात्र पत्नीच्या एका नजरेने घायाळ झाला होता. आशिष नेहरा व त्याची पत्नी रुश्मा नेहराची प्रेमकथा एखाद्या चित्रपटाची पटकथेसारखीच आहे. आता दोन मुलांचे पालक असलेल्या या दाम्पत्याने सात वर्षे एकमेकांना डेट केल्यावर सात जन्माच्या गाठी बांधल्या होत्या.

Ashish Nehra- Rushma Nehra Love Story

कोण आहे रुश्मा नेहरा?

रुश्मा नेहरा ही मुळची गुजरातची आहे. ती व्यवसायाने एक आर्टीस्ट आहे. आपल्या पतीसारखेच तिचे आयुष्य एकदम शांत असते. मात्र २०१७ मध्ये जेव्हा तिने एन्स्टाग्राम जाँईने केले, तेव्हापासून तिचे लाखो फाँलोअर्स आहेत. आशिष नेहराचे आणि तिचे फोटो ती या अकाऊंटवर कायम पोस्ट करत असते. तिला फिरायला खूप आवडतं आणि ती त्या गोष्टीही आपल्या फोँलोअर्सशी शेअर करते.

कशा जुळल्या रेशीमगाठी

आशिष नेहरा २००२ मध्ये टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. भारतीय संघ ओव्हलमध्ये यजमान संघासोबत सामना खेळत होता. तिथेच नेहराची रश्माशी पहिली भेट झाली. पहिल्याच नजरेत नेहराला रश्मावर प्रेम झाले. तेव्हा रश्मा ओव्हल स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी आली होती. येथून दोघांची एकमेकांशी ओळख झाली आणि ते भेटू लागले. त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आणि त्यांच्या गप्पाही वाढल्या, त्यानंतर ही प्रेमकहाणी सुरू झाली.

समजून घ्यायला लागले ७ वर्षे

आशिष नेहरा आणि रुश्मा यांनी ७ वर्षे एकमेकांना डेट केले. त्यानंतर दोघांनीही हे नाते सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला. आशिष नेहराने त्याच्या मित्रांसोबत फिरायला जाताना रुश्माला प्रपोज करण्याचा विचार केला. मार्च २००९ चा महिना होता जेव्हा आशिष नेहरा काही मित्रांसोबत बसला होता. त्याच क्षणी त्याच्या मनात लग्नाचा विचार आला. जेव्हा नेहराने पहिल्यांदा रुश्माला प्रपोज केले तेव्हा तिला तो विनोद वाटला. पण दुसऱ्या दिवशीही नेहराने रुश्माला तेच सांगितले. यानंतर रुश्माने ते गांभीर्याने घेतले. रुश्माला सुरुवातीला धक्का बसला पण नंतर तिने हो म्हटले.

१५ मिनिटांत लग्नाचा प्लॅन

काही वर्षांपूर्वी आशिष नेहराने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्या लग्नाचा संपूर्ण प्लॅन फक्त १५ मिनिटांत बनवण्यात आला. एका आठवड्यात दोघांनीही सात प्रतिज्ञा घेतल्या. तेव्हा नेहराने सांगितले होते की, रुश्माला प्रपोज केल्यानंतर अवघ्या १० दिवसांतच दोघांनी २ एप्रिल २००९ रोजी लग्न केले. नेहरा आणि त्याची पत्नी अजूनही त्यांचे आयुष्य खाजगी ठेवण्यावर विश्वास ठेवतात. त्याला मीडियाच्या प्रसिद्धीपासून दूर राहणे आवडते. रुश्मा एक कलाकार आहे आणि तिला क्रिकेट पाहणे खूप आवडते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+