टीम इंडियाच्या या 4 खेळाडूंचा विधानभवानत होणार सत्कार
Team India : भारतीय क्रिकेट संघाने T20 विश्वचषक जिंकल्याने संपूर्ण देश आनंदी आहे. 17 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारताने विश्वचषक जिंकला आहे. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून भारत दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड चॅम्पियन बनला.या विजयानंतर भारतीय संघ आज (4 जुलै) भारतात परतला आहे. यावेळी टीम इंडियाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे.

सध्या टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी दाखल झाले आहेत. यावेळी टीम इंडियाचे खेळाडू नरेंद्र मोदींसोबत ब्रेकफास्ट करणार आहेत. यानंतर टीम इंडिया मुंबईसाठी रवाना होणार आहे. दुपारी 2 ते 3च्या सुमारास टीम इंडिया मुंबईत दाखल होईल. मुंबईत टीम इंडियाची विजयी यात्रा काढण्यात येणार आहे. टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवरही जाईल. याठिकाणी भारतीय संघाच्या स्वागतासाठी जंगी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
#WATCH | Shiv Sena leader Pratap Sarnaik says "Today's program in Mumbai has been organised by BCCI. Team India players from Mumbai including Captain Rohit Sharma, Suryakumar Yadav, Shivam Dubey and Yashasvi Jaiswal will come to the Maharashtra Assembly tomorrow to meet CM Eknath… pic.twitter.com/3Dh0S28JRf
— ANI (@ANI) July 4, 2024
दरम्यान मुंबईत महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान भारतीय संघांचे मुंबईतील खेळाडू रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या (5 जून रोजी) भेट घेणार आहे. यावेळी विधीमंडळाच्या सभागृहात या खेळाडूंचा खास सत्कार करण्यात येणार आहे. यासंदर्भात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत आज माहिती दिली. यासंबंधीचे निमंत्रण या खेळाडूंना देण्यात आलं आहे . यावेळी सर्व पक्षाचे आमदार उपस्थित रहावे यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे विनंती करणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
मुंबईत होणार जंगी स्वागत
टीम इंडियाचे खेळाडू आज दुपारी 4 पर्यंत मुंबईत येतील. त्यानंतर त्यांची मुंबईत भव्य विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. टीम इंडियाची विजयी मिरवणूक नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम दरम्यान काढण्यात येणार आहे. डबल डेकर ओपन डेक बसमधून ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. या बसवर वर्ल्ड कप विजयी संघांचे स्टीकर लावण्यात आले आहेत.












Click it and Unblock the Notifications