भारताच्या विजयानंतर रोहित शर्माच्या डोळ्यात अश्रू, चाहते ही झाले भावूक
T20 World Cup 2024: भारताने ज्याप्रकारे एकदिवसीय विश्वचषकातील सर्व सामने जिंकून फायनलमध्ये दमदार एंट्री केली, तशीच कहाणी T20 विश्वचषकात पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.

एकदिवसीय विश्वचषकातही रोहित शर्मा वेगळ्याच स्फोटक शैलीत दिसला आणि त्याने आपल्या झंझावाती फलंदाजी आणि धडाकेबाज कर्णधारपदाच्या जोरावर भारताला अंतिम फेरीत नेले. रोहित शर्माची हीच शैली टी-२० विश्वचषकातही कायम आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये रोहितने शानदार फलंदाजी करत सलग दोन अर्धशतकांच्या खेळी खेळून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचा एक भावनिक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये भारताने अंतिम फेरी गाठल्यानंतर तो भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. डगआऊटमध्ये खुर्चीवर बसलेल्या रोहीतच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत.हा व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते भावूक झाल्याचे दिसून येत आहे.
2022 चा बदला पूर्ण:
गेल्या T-20 विश्वचषकात, भारत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभूत होत विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातून बाहेर पडला होता होते. या सामन्यात भारताने एकतर्फी झालेल्या सामन्यात इंग्लंडचा मोठ्या फरकाने पराभव केला.पण यावेळी भारताने त्या पराभवाचा बदला घेत एकतर्फी सामन्यात इंग्लंडचा 68 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने 7 महिन्यांत सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. हा सामना २९ जून रोजी होणार आहे. म्हणजे उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर फक्त एक दिवसाचा ब्रेक असेल आणि भारत अंतिम सामना खेळायला जाईल.
विराटने रोहितच्या चेहऱ्यावर हसू आणले
परिस्थितीचे गांभीर्य पाहून रोहित शर्माने स्वत:ला सावरले. इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण सामन्यात रोहित गंभीर दिसत होता, पण जेव्हा भारताने इंग्लंडला 103 धावांवर ऑलआउट केले तेव्हा रोहित ड्रेसिंग रूममध्ये भावूक झाला. विजयानंतर तो शांतपणे खुर्चीवर बसला आणि तो क्षण अनुभवू लागला. यादरम्यान विराट कोहली त्याला चिअर करण्याचा आणि चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
रोहितच्या मनात काय आहे ते रवी शास्त्रींनी सांगितले
रोहितच्या चेहऱ्यावरची शांतता बघायला मिळते असे रवी शास्त्री म्हणाले. तो खुर्चीवर बसला आहे. शेवटी, तुम्ही काय विचार करत असाल? मी तुम्हाला सांगतो की, त्याने आधीच ब्रिजटाऊनबद्दल विचार करायला सुरुवात केली असेल. शनिवारी होणारा अंतिम सामना त्याच्या मनात खेळू लागला असावा.












Click it and Unblock the Notifications