Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अफगाणिस्तानच्या 'या' फलंदाजाने एकाचवेळी मोडला विराट-सचिनचा विक्रम

Afghanistan vs Bangladesh ODI Series : अफगाणिस्तान आणि बांग्लादेशमध्ये शारजाह येथे वनडे सीरीजमधला शेवटचा सामना खेळला गेला. या मॅचमध्ये युवा ओपनर रहमानुल्लाह गुरबाजने धडाकेबाज खेळ दाखवला.

अफगाणिस्तानने हा सामना 5 विकेटने जिंकतानाच सीरीज 2-1 ने जिंकली आहे. या सामन्यात अवघ्या 22 वर्षांच्या अफगाणिस्तानी फलंदाजाने एकाच वेळी विराट-सचिनचा रेकॉर्ड मोडला आपण आज याच विषयावर आज जाणून घेणार आहोत.

Rahmanullah Gurbaz

गुरबाजचं बांग्लादेश विरुद्ध तिसऱ्या वनडेत शतक

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावावर करियरमध्ये शानदार रेकॉर्ड्स आहेत. विराट कोहलीने त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासात अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. अजूनही त्याची अशी कामगिरी सुरु आहे. विराटने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे सुद्धा रेकॉर्ड मोडले आहेत. त्याच्याआधी सचिन हेच काम करायचा. सचिनने जुने रेकॉर्ड मोडून नवीन इतिहास रचला. आता अफगाणिस्तानच्या एका युवा फलंदाजाने एकाचवेळी या दोन दिग्गजांना मागे टाकलं आहे. या फलंदाजाच नाव आहे, रहमानुल्लाह गुरबाज. त्याने बांग्लादेश विरुद्ध तिसऱ्या वनडेत शतक ठोकलं. गुरबाजने टीमला मॅचसह सीरीजमध्ये सुद्धा विजय मिळवून दिला.

गुरबाजनं फक्त 46 इनिंग्समध्ये करियरमधील आठवं शतक झळकावल

शारजाहमध्ये सोमवारी 11 नोव्हेंबरला सीरीजमधला तिसरा आणि शेवटचा सामना झाला. बांग्लादेशने पहिली बॅटिंग केली. त्यांनी अफगाणिस्तानला विजयासाठी 245 धावांच टार्गेट दिलं होतं. अफगाणिस्तानकडून 22 वर्षांचा युवा ओपनर गुरबाज मैदानात उतरला. त्याने मैदानात येताच स्फोटक फलंदाजी सुरु केली. समोरच्या टोकाचे फलंदाज एकाबाजूने बाद होत असताना गुरबाज टिकून राहिला. त्याने 38 व्या ओव्हरमध्ये एक धाव घेऊन करियरमधील आठवं शतक झळकावलं. गुरबाजने 117 चेंडूत शतक पूर्ण केलं. गुरबाजच या वर्षातील हे तिसरं शतक आहे.

सर्वात कमी वयात 8 वं वनडे शतक झळकावणारा दुसरा फलंदाज

या शतकासोबतच गुरबाजने दोन महान भारतीय फलंदाजांना मागे टाकलं. गुरबाज सर्वात कमी वयात 8 वं वनडे शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. गुरबाज 22 वर्ष 349 दिवसांचा असताना त्याने 8 वं वनडे शतक झळकावलं. अशा प्रकारे त्याने सचिनच्या नावावर असलेला (22 वर्ष 357 दिवस) आणि विराट कोहलीचा (23 वर्ष 27 दिवस) रेकॉर्ड मागे टाकला. त्याशिवाय बाबर आजम (23 वर्ष 280 दिवस) मागे पडला. या बाबतीत गुरबजाच्या पुढे दक्षिण आफ्रिकेचा ओपनर क्विंटन डिकॉक (22 वर्ष 312 दिवस) आहे. 22 वर्षाच्या गुरबाजने फक्त 46 इनिंग्समध्ये हा किर्तीमान स्थापित केलाय. हा नवीन वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+