Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ENG vs AFG : इब्राहिम झद्रानचे शतक; बेन डकेटनेही केला हा विक्रम, वाचा दोन्ही संघाचे विक्रम

चॅम्पियन्स ट्रॉफी- २०२५ चा 9 वा सामना इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानकडून इब्राहिम झद्रानने शानदार शतक झळकावले. यासह, तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करणारा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू बनला आहे.

Afghanistan vs England

अफगानिस्तानने जिंकला टाँस

इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु संघाने ३७ धावांवर ३ विकेट गमावल्या. जोफ्रा आर्चरने त्याच्या पहिल्याच षटकात २ बळी घेत अफगाणिस्तानच्या टॉप ऑर्डरला पॅव्हिलियनमध्ये परत पाठवले. यानंतर ९ व्या षटकात आणखी एक विकेट घेऊन आर्चरने अफगाणिस्तान संघाला बॅकफूटवर आणले. आर्चरने हमानुल्लाह गुरबाजला फक्त ६ धावांवर बाद केले. यानंतर, सेदिकुल्लाह अटल आणि रेहमत शाह यांना ४-४ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात आले.

इब्राहिम झद्रानने केला विक्रम

त्यानतर इब्राहिम झद्रानने अफगाणिस्तानच्या डावाची धुरा सांभाळली. संघाचा धावसंख्या २०० च्या पुढे नेली. या काळात त्याने एक शानदार शतक झळकावले. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करणारा अफगाणिस्तानचा तो पहिला फलंदाज बनला. इब्राहिमने १७७ धावा केल्या. यापूर्वी इब्राहिम झद्रानने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात शतक झळकावले होते. तो एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानसाठी शतक करणारा फलंदाजही बनला. आता त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ही कामगिरी केली आहे.

अफगाणिस्तानचा धावांचा डोंगर

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने इब्राहिम झद्रानच्या १७७ धावांच्या खेळीच्या जोरावर ३२५ धावा केल्या. ३२६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंड संघाकडून बेन डकेट सलामीला आला. बेन डकेटने ४ धावा काढताच एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या १००० धावा पूर्ण केले. बेन डकेटने इंग्लंडसाठी सर्वात जलद १००० एकदिवसीय धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत केविन पीटरसनची बरोबरी केली. त्याने २१ डावांमध्ये ही कामगिरी केली. डावांच्या बाबतीत डकेट संयुक्तपणे चौथ्या क्रमांकाचा सर्वात जलद धावा करणारा फलंदाज आहे. या बाबतीत त्याने केविन पीटरसन आणि व्हिव्हियन रिचर्ड्स सारख्या दिग्गजांची बरोबरी केली.

सर्वात कमी चेंडूत १००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा तिसरा इंग्लिश खेळाडू
८६० - जोस बटलर
९५२ - जेसन रॉय
९५६ - बेन डकेट

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+