Womens Asia Cup : भारतीय वाघिणींसमोर पाकिस्तानचा पाडाव; वृंदाची वादळी खेळी, 8 गडी राखून विजय!
ACC Womens Asia Cup Rising Stars 2026 : T-20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान महामुकाबल्याचा फिव्हर जगभरात असतानाच, बँकॉकमध्ये सुरू असलेल्या 'एसीसी महिला आशिया कप रायझिंग स्टार्स 2026' स्पर्धेत भारत 'अ' संघाने पाकिस्तान 'अ' संघाचा धुव्वा उडवला आहे. सलामीवीर वृंदा दिनेश हिच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर भारताने केवळ 10.1 षटकात 94 धावांचे लक्ष्य गाठत पाकिस्तानवर 8 गडी राखून दिमाखदार विजय मिळवला.

वृंदा 'रुद्रावतार'; 10 षटकातच पाकिस्तानचा गेम ओव्हर
पाकिस्तानने दिलेल्या 94 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात धक्कादायक झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर हुमैरा काझी शून्यावर बाद झाली. मात्र, या धक्क्यानंतर वृंदा दिनेशने मैदानावर चौकारांचा पाऊस पाडला.
वृंदाने अवघ्या २९ चेंडूत १२ चौकारांसह नाबाद ५५ धावा कुटल्या. तिने अनुष्का शर्मा (२४ धावा) हिच्यासोबत दुसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची निर्णायक भागीदारी केली. तेजल हसबनीसने नाबाद १२ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने हे लक्ष्य फक्त ६१ चेंडूत पूर्ण करून पाकिस्तानच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले.
Pakistan never quite found their rhythm and finish on 93. India were clinical with the ball and will now look to chase this in style 💪
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) February 15, 2026
A straightforward chase on the cards ~ or is there a twist waiting to unfold? 🤔#DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 #INDWvPAKW #ACC pic.twitter.com/jKVuBJ4ZmN
भारतीय गोलंदाजांची धार: पाकिस्तान 93 धावांत गारद
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा पाकिस्तानचा निर्णय त्यांच्यावरच उलटला. भारताच्या अचूक माऱ्यासमोर पाकिस्तानचा संपूर्ण संघ १८.५ षटकात अवघ्या 93 धावांत तंबूत परतला.
पाकिस्तानी फलंदाजी : शवाल झुल्फिकार (२३), गुल रुख (२१) आणि अनुषा नासिर (१७) या तिघींशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
भारतीय गोलंदाजी : कर्णधार राधा यादव, प्रेमा रावत आणि साईमा ठाकोर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले, तर जिंतीमणी कलिता आणि मिन्नू मणी यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवून पाकिस्तानच्या डावाला खिंडार पाडले.
गुणतालिकेतील स्थिती आणि पुढील आव्हान!
या विजयामुळे भारतीय संघाने स्पर्धेतील आपले आव्हान भक्कम केले आहे.
पॉइंट्स टेबल : दोन सामन्यांत एक विजय आणि एक पराभवासह भारत 'अ' संघ सध्या गट 'अ' मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. युएईचा संघ अव्वल स्थानी आहे.
पुढचा सामना: भारताचा शेवटचा गट सामना १७ फेब्रुवारी रोजी नेपाळविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकल्यास भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होईल.
स्पर्धेचे स्वरूप
गट 'अ' मध्ये भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि युएई यांचा समावेश आहे, तर गट 'ब' मध्ये थायलंड, मलेशिया, बांगलादेश आणि श्रीलंका हे संघ झुंजत आहेत. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीत भिडतील, तर स्पर्धेचा महाअंतिम सामना २२ फेब्रुवारीला पार पडेल.
दोन्ही संघांचे 'प्लेइंग इलेव्हन'
भारत अ : राधा यादव (कर्णधार), हुमैरा काझी, वृंदा दिनेश, तेजल हसबनीस, अनुष्का शर्मा, ममता माडीवाला (यष्टीरक्षक), तनुजा कंवर, प्रेमा रावत, मिन्नू मणी, सायमा ठाकोर आणि जिंतीमणी कलिता.
पाकिस्तान अ : हफसा खालिद (कर्णधार), युसरा अमीर (यष्टीरक्षक), शवाल झुल्फिकार, हुरैना सज्जाद, ओमैमा सोहेल, गुल रुख, इमान नसीर, वहिदा अख्तर, अनुषा नासिर, मोमिना रियासत आणि नेहा शर्मीन.












Click it and Unblock the Notifications