IPL 2025 : IPL 2025 बद्दल मोठी अपडेट; कुणाकुणात रंगणार पहिला सामना? वाचा संपूर्ण माहिती
आयपीएल- 2025 यावर्षीची आयपीएल स्पर्धा 21 मार्चपासून सुरू होणार आहे. आता याच स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक या आठवड्यात प्रसिद्ध होऊ शकते. स्पर्धेचा पहिला सामना गेल्या हंगामातील अंतिम फेरीतील संघांमध्ये होईल. गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने विजेतेपद पटकावले होते. त्यांनी अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला होता. म्हणजेच या दोन संघात पहिला समना खेळविला जाईल.

कधी होईल स्पर्धेला सुरुवात?
यंदाची आयपीएल स्पर्धा ही 14 मार्चपासून सुरु होणार होती. मात्र काही अपहिहार्य कारणामुळे ही स्पर्धा आता 21 मार्चपासून सुरु होणार आहे. आयपीएल स्पर्धा गेल्या काही वर्षांपासून चांगलीच गाजत आहे. यंदाच्या स्पर्धेबाबत अद्याप काहीही अपडेट आली नसली तरी, क्रीडा पत्रकार विजय टागोर यांनी X द्वारे आयपीएल 2025 बद्दल एक अपडेट शेअर केला आहे. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे की, आयपीएल २०२५ चे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाऊ शकते.
कोणामध्ये होईल पहिला सामना?
स्पर्धेचा पहिला सामना मागील हंगामातील अंतिम फेरीतील संघांमध्ये खेळला जातो. त्यामुळे ही परंपरा यावेळीही सुरू राहू शकते. आयपीएल 2024 चा अंतिम सामना कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आला. यावेळी आयपीएल 2025 चा पहिला सामना या दोन संघांमध्ये होऊ शकतो. हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर होऊ शकतो.












Click it and Unblock the Notifications