ऑलिम्पिक हिरो अर्शद नदीमवर पैशांचा पाऊस! सुवर्णपदक जिंकताच 250 मिलियनचे बक्षीस
ऑलंपिक भालाफेक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीमला मंगळवारी 250 मिलियन रुपये ($897,000) मिळाले आहेत. त्याने पॅरिस ऑलिम्पिक विश्वविक्रम करत सुवर्णपदक जिंकले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहजाब शरीफ यांनी इस्लामाबादमध्ये एका विशेष समारंभात नदीमसाठी 150 मिलियन रुपयांची ($538,000) घोषणा केली। पंजाबचे (पाकिस्तान) मुख्यमंत्री मरीअम नवाज चन्नू जिल्ह्यातील नदीमच्या घरी गेले होते त्यावेळी त्यांनी 100 मिलियन रुपयांचा ($359,000) चेक दिला होता त्यांनतर ही घोषणा करण्यात आली आहे.

नवाज यांनी नदीमला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 92.97 मीटर लांबीपर्यंत रेकाॅर्ड थ्रो केल्या निमित्त विशेष नोदंणी क्रमांक "PAK 92.97" असेलेल्या कारची चावी देखील दिली. याशिवाय नदीमचे कोच सलमान इकबाल बट यांना 5 मिलियन रुपये ($18,000) मिळाले.
नदीमसाठी रकमेची घोषणा करत शरीफ म्हणाले की, तुम्ही 250 मिलियन पाकिस्तानवासियांचा आनंद दुप्पट केला आहे, कारण आपण उद्या स्वातंत्र्यदिन देखील साजरा करणार आहोत. आज प्रत्येक पाकिस्तानी नागरिक आनंदी आहे आणि देशाचे मनोबल वाढले आहे.
संपूर्ण पाकिस्तानात जल्लोष
मागील गुरुवारी संपूर्ण पाकिस्तानात जल्लोष करण्यात आला जेव्हा नदीमने नाॅर्वेच्या अॅंड्रियास थोरकिल्डसने 2008 मध्ये केलेले मागील ऑलिम्पिकमधील 90.57 मीटरचे रेकाॅर्ड मोडले. हे टोकियो चॅंपियन भारताच्या नीरज चोप्रापेक्षा खूप पुढे होता, ज्याने रजत साठी सिझनचे सर्वश्रेष्ठ 89.45 मीटरचे रेकाॅर्ड बनविले. नवाज यांनी म्हटले की, अर्शद नदीमने देशात अभूतपूर्व आनंद निर्माण केला आहे.
लाॅस एंजिल्समधील खेळांत1984 मध्ये पुरुष हाॅकी टीम जिंकल्यांनतर 40 वर्षांनतर पाकिस्तानने पहिले ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकले. पाकिस्तानचे कोणत्याही रंगाचे शेवटचे पदक 1992 बार्सिलोना खेळांत फिल्ड हाॅकी कांस्य होते. नवाज यांनी आपल्या एक्स वर पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आईवडिलांची प्रार्थना एखाद्या व्यक्तीला उंचीवर घेऊन जाते"
भविष्यातील आकांक्षा
नदीम ने मंगळवारी म्हटले की, मला खूप आनंद होत आहे, मला आशा आहे की मी फिट राहिल आणि एक दिवस जागतिक विक्रम मोडेन। यानंतर नदीम आणि त्याच्या कुटुंबाला मुलतानवरुन एका विशेष विमानाने इस्लामाबादला नेण्यात आले जिथे शरीफ यांनी आयोजित केलेल्या रिसेप्शनसाठी गेले. शरीफ म्हणाले, नदीम ने रात्रंदिवस अपार मेहनत, आईवडिलांची प्रार्थना आणि कोचने दिलेल्या प्रशिक्षणामुळे पाकिस्तानचे नाव जगभरात उंचावले आहे.
क्रिडा विश्वात पाकिस्तान हा देश प्रामु्ख्याने क्रिकेटसाठी ओळखला जातो. पाकिस्तानने 1992 चा विश्वकप जिंकला होता. कसोटी कप्तान शान मसूदने पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या पाॅडकाॅस्टमध्ये म्हटले की, त्याला पोडियम वर झेंडा फडकवताना आणि घंटी वाजवताना पाहणे अविश्वसनीय होते. हे विधान त्यांनी 21 आॅगस्टला रावळपिंडीत बांगलादेश विरुद्ध सुरु होणा-या टेस्ट सिरीजच्या तयारी दरम्यान केले.
विशेष सन्मान
नदीमच्या सन्मानार्थ त्याचे रेकाॅर्ड थ्रो दर्शविणारे एक विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले आहे. याशिवाय, पाकिस्तानचे रेड-बाॅल हेड कोच जेसन गिलेस्पी ने सांगितले की बांगलादेश विरुद्ध पहिल्या टेस्ट मॅच दरम्यान पाकिस्तान क्रिकेट टीमच्या ड्रेसिंग रुममध्ये निंमत्रित करण्यात येईल.
गिलेस्पी म्हणाले की, नदीमचे टीमसोबत येणे आणि सुवर्णपदक शेअर करणे हा एक शानदार अनुभव असेल, खासकरुन ऑलंपिकची सध्या सुरु आहे अशा वेळी. गिलेस्पी म्हणाले की, हा एक अद्भुत क्षण होता, आणि आम्ही त्यांना खुले निमंत्रण देतो, विविध क्षेत्रांतून मिळालेली मान्यतांमुळे नदीमने गाजवलेले कर्तृत्व पाकिस्तानसाठी किती महत्वाचे आहे यावर प्रकाश पडतो.












Click it and Unblock the Notifications