ZP Panchayat Samiti Election 2026: मतमोजणीपूर्वीच महायुती 27 जागांवर विजय! बिनविरोध विजेत्यांची यादी
ZP Panchayat Samiti Election 2026 : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असतानाच, महायुतीने निवडणुकीपूर्वीच मोठी आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. कोकण पट्ट्यात महायुतीचे तब्बल २७ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, यात प्रामुख्याने भाजप आणि शिंदे गटाच्या उमेदवारांचा समावेश आहे. आज सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून असून सर्वांचे लक्ष निकालांकडे लागले आहे.

सिंधुदुर्गात भाजपचा बालेकिल्ला भक्कम
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये महायुतीने आपला दबदबा निर्माण केला आहे. ५० सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे ७ आणि शिंदे गटाचा १ असे एकूण ८ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. तर जिल्ह्यातील पंचायत समितीच्या १०० जागांपैकी भाजपचे १६ आणि शिंदे सेनेचा १, अशा एकूण १७ जागांवर महायुतीने आधीच गुलाल उधळला आहे.
निवडणुकीची आकडेवारी एका नजरेत:
- एकूण जिल्हा परिषदा: १२ (७३१ जागा)
- एकूण पंचायत समित्या: १२५ (१,४६२ जागा)
- रिंगणातील एकूण उमेदवार: ७,४३८
- बिनविरोध विजयी जागा: २७ (कोकण विभाग)
सिंधुदुर्ग: महायुतीच्या बिनविरोध विजयी उमेदवारांची नामावली (२०२६)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदानापूर्वीच महायुतीने विजयाचा गुलाल उधळला आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या ८ आणि विविध पंचायत समित्यांच्या १७ जागांचा समावेश आहे. सिंधुदुर्गात भाजपने आपले वर्चस्व राखले असून, शिंदे गटानेही मोक्याच्या जागांवर यश मिळवले आहे. विरोधकांनी अर्ज मागे घेतल्याने या उमेदवारांची निवड बिनविरोध झाली आहे.
१. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग (८ जागा बिनविरोध)
- जिल्हा परिषदेत भाजपने ७ तर शिवसेना (शिंदे गट) कडून एका जागेवर विजय मिळवला आहे.
- खारेपाटण: प्राची इस्वालकर (भाजप)
- बांदा: प्रमोद कामत (भाजप)
- जाणवली: रुहिता राजेश तांबे (शिवसेना)
- पडेल: सुयोगी रविंद्र घाडी (भाजप)
- बापर्डे: अवनी अमोल तेली (भाजप)
- पोंगुर्ले: अनुराधा महेश नारकर (भाजप)
- किंजवडे: सावी गंगाराम लोके (भाजप)
- कोळपे: प्रमोद पुंडलिक रावराणे (भाजप)
२. पंचायत समिती स्तरावरील विजेते (तालुकानिहाय)
कणकवली पंचायत समिती (६ जागा)
- १. वरवडे: सोनू सावंत (भाजप)
- २. नांदगाव: हर्षदा हनुमंत वाळके (भाजप)
- ३. जाणवली: महेश्वरी महेश चव्हाण (भाजप)
- ४. बिडवाडी: संजना संतोष राणे (भाजप)
- ५. हरकुळ बुद्रुक: दिव्या दिनकर पेडणेकर (भाजप)
- ६. नाटळ: सायली संजय कृपाळ (भाजप)
देवगड पंचायत समिती (६ जागा)
- १. पडेल: अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)
- २. नाडण: गणेश सदाशिव राणे (भाजप)
- ३. बापर्डे: संजना संजय लाड (भाजप)
- ४. फणसगाव: समृद्धी संतोष चव्हाण (भाजप)
- ५. शिरगाव: शितल सुरेश तावडे (भाजप)
- ६. कोटकामते: ऋतुजा राकेश खाजनवाडकर (भाजप)
अन्य तालुके (प्रत्येकी १ जागा)
- वैभववाडी (कोकिसरे): सौ. साधना सुधीर नकाशे (भाजप)
- वेंगुर्ले (आसोली): संकेत धुरी (भाजप)
- मालवण (अडवली मालडी): सीमा सतीश परुळेकर (भाजप)
- सावंतवाडी (शेरले): महेश धुरी (भाजप)
- दोडामार्ग (कोलझर): गणेश प्रसाद गवस (शिवसेना- शिंदे गट)












Click it and Unblock the Notifications